Monday, October 14, 2024
Home कॅलेंडर एक-दोन नाही, तर तब्बल आठ भाषा बोलते रणबीरची ‘ही’ अभिनेत्री; लग्नानंतर एका महिन्यातच दिलेली गोड बातमी

एक-दोन नाही, तर तब्बल आठ भाषा बोलते रणबीरची ‘ही’ अभिनेत्री; लग्नानंतर एका महिन्यातच दिलेली गोड बातमी

‘यह जवानी है दिवानी’, ‘यारीया’, ‘नौटंकी साला’, ‘मैं तेरा हीरो’ या चित्रपटात काम करुन भरघोस यश मिळवणारी आणि मूळची जर्मन असणारी अभिनेत्री म्हणजे एवलिन शर्मा. खरंतर असे खूप कलाकार असतात, जे मोजक्याच चित्रपटात काम करून देखील प्रेक्षकांची वाह वाह मिळवतात. त्यातीलच एक वाखडण्याजोगी अभिनेत्री म्हणजे एवलिन शर्मा. बुधवारी(दि. 12 जुलै) ती तिचा वाढदिवस साजरा करत आहे. तिचा जन्म 12 जुलै, 1986 मध्ये जर्मन येथे झाला होता. जर्मनमध्ये जन्म झालेला असला, तरी ती आज बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री आहे. चला तर तिच्या आयुष्यातील खास गोष्टींबाबत जाणून घेऊया…

एवलिनचे वडील भारतीय आणि आई जर्मन आहे. तिला कॉलेजच्या दिवसापासूनच मॉडेलिंगची आवड होती. या दरम्यान तिने काही कॉस्मेटिक ब्रँडसाठी मॉडेलिंग सुरू केली होती.

एवलिनला एकूण आठ भाषा अवगत आहेत. तिला इंग्लिश, हिंदी, जर्मन, स्पॅनिस, थाई, टेगलॉग, फिली पिनीफ्रेंच आणि डच या भाषा येतात.

तिने ‘फ्रॉम सिडनी विथ लव्ह’ या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. त्यानंतर तिने बॉलिवूडमधील अनेक चित्रपटात काम केले आहे.

एवलिनने जून 2020मध्ये ऑस्ट्रेलियामध्ये अचानक लग्न केले होते. या बातमीने तिचे चाहते खूप हैराण झाले होते. विशेष म्हणजे, लग्नाच्या एका महिन्यानंतर तिने सर्वांना ही गोड बातमी दिली होती की, ती आई होणार आहे. तिने सोशल मीडियावर एक फोटो शेअर करून सांगितले होते की, “तुला कवेत घेण्यासाठी मी जास्त वाट बघू शकत नाही.” तिने दिलेल्या या बातमीने तिच्या चाहत्यांमध्ये आनंदाचे वातावरण होते. तसेच तिने सांगितले होते की, या बातमीने तिचा वाढदिवस आणखी खास बनवला आहे.

तिने 15 मेला तिचा बॉयफ्रेंड तुषान भिंडीसोबत ऑस्ट्रेलियामधील ब्रिटन येथे लग्न करून सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला होता. एवलिन आणि तुषार एकमेकांना 2018पासून ओळखतात. एक वर्षाच्या मैत्रीनंतर तुषानने एवलिनला प्रपोज केले होते त्यांनी ऑक्टोंबर 2019मध्ये साखरपुडा केला होता आणि याच वर्षी कोणालाही काहीच न कळवता त्यांनी लग्न देखील केले आहे.(Birthday special : this thing made Evelyn Sharma’s birthday more special)

अधिक वाचा-
प्रिती झिंटाने केले जुळ्या मुलांचे मुंडण, फाेटाे शेअर करत सांगितले विधीचे महत्त्व
राखीने सांगितला 15 दिवसात टोमॅटो पिकवण्याचा भन्नाट उपाय; म्हणाली, ‘सात जन्मासाठी उपयुक्त…’

author avatar
Tejswini Patil

हे देखील वाचा