छोट्या पडद्यावरील मन उडू उडू झाल मालिकेला प्रेक्षकांचा जोरदार प्रतिसाद पाहायला मिळत आहे. या मालिकेची कथा आणि कलाकारांचा अभिनय प्रेक्षकांना चांगलाच भावला असून मालिकेने घराघरात प्रचंड लोकप्रियता मिळवली आहे. मालिकेतील प्रत्येक कलाकाराने आपल्या भूमिकेसाठी घेतलेली मेहनत आणि आणलेला जिवंतपणा यामुळे मालिकेतील कलाकारांचे चांगलेच कौतुक झाले होते. परंतु आता लवकरच ही मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार असल्याचे निश्चित झाले आहे.
याबाबत संपूर्ण माहिती अशी की, अभिनेत्री ऋता दुर्गुळे आणि अजिंक्य राऊतच्या प्रमूख भूमिका असलेली मन उडू उडू झाल सध्या सर्वत्र चर्चेत आहे. आत्तापर्यंत या मालिकेने प्रेक्षकांचे जोरदार मनोरंजन केले. घराघरात मालिकेच्या कलाकारांना जोरदार प्रतिसाद पाहायला मिळाला. परंतु आता ही मालिका लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेणार असल्याची माहिती समोर आली आहे. पुढील महिन्यात या मालिकेचा शेवट होणार असणार असल्याच वृत्त समोर आले आहे. ज्यामध्ये ऑगस्ट १३ रोजी या मालिकेचा शेवटचा एपिसोड प्रसारित होणार असल्याची माहिती समोर आली आहे. या बातमीने मालिकेच्या प्रेक्षकांमध्ये निराशा पसरल्याचेही दिसत आहे.
View this post on Instagram
मन उडू उडू झाल मालिकेने प्रेक्षकांचा निरोप घेतल्यानंतर तु चाल पुढं ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीता येणार आहे. या मालिकेतून पहिल्यांदाच अभिनेत्री दिपा परब छोट्या पडद्यावर पुनरागनमन करताना दिसत आहे. एका जिद्दी गृहिणीची कथा या मालिकेत दाखवण्यात येणार आहे.या नव्या मालिकेचा प्रोमो नुकताच प्रदर्शित झाला असून प्रेक्षकांचाही त्याला जोरदार प्रतिसाद पाहायला मिळत आहे. त्यामुळे आता या नव्या मालिकेची प्रेक्षकांना जोरदार उत्सुकता लागली आहे.
हेही वाचा –
म्हणून राखी सावंतचे पित्त खवळले, थेट हातात फावडे घेऊन रिक्षाच्या मागे सुटली पळत
सुशांत सिंग राजपूत प्रकरणात आरोपी क्षितिज प्रसादची विनवणी; म्हणाला, ‘मला निर्दोष सोडा, मी कधीच…’
आयच्या गावात! जेवढे घालवले, तेवढेही नाही मिळाले; ‘या’ सिनेमांनी निर्मात्यानाही केले कंगाल










