बॉलिवूड अभिनेता सुनील शेट्टीची (Suniel Shetty) लाडकी मुलगी अथिया शेट्टी (Athiya Shetty) क्रिकेटर केएल राहुलला (KL Rahul) बऱ्याच दिवसांपासून डेट करत आहे. त्यांच्या नात्याच्या चर्चा सध्या जगभर रंगल्या आहेत. दोघेही सोशल मीडियावर रोमँटिक फोटो शेअर करत असतात. आता बॉलिवूड आणि क्रिकेटमध्ये बनलेल्या या नव्या जोडप्याच्या लग्नाची बातमी व्हायरल होत आहे. अभिनेत्री अथिया येत्या तीन महिन्यांत केएल राहुलची वधू बनणार असल्याची चर्चा मीडियात आहे. मात्र या बातमीवर बाबा सुनील शेट्टी यांनी दिलेल्या प्रतिक्रियेने चाहत्यांचे टेन्शन वाढले आहे.
खरं तर, अथिया आणि राहुलच्या डेटींगच्या बातम्या खूप चर्चेत असतात. दरम्यान दोघांच्या लग्नावरही प्रश्न उपस्थित झाले आहेत. मात्र दोघेही त्यांच्या लग्नाबद्दल मीडियासमोर काहीही बोलले नाहीत. अलीकडेच बातमी आली आहे की, सुनील शेट्टीच्या घरात सनई वाजणार आहे. अथिया आणि केएल राहुलने लग्नाचा निर्णय घेतला आहे. हे ऐकून केएल राहुल आणि अथियाचे चाहते खूप खुश झाले होते. पण बाबा सुनील शेट्टीने लग्नाची ही बातमी अफवा असल्याचे सांगून फेटाळून लावली आहे. सुनील शेट्टीने मीडियाला सांगितले की, असे कोणतेही नियोजन अद्याप झालेले नाही. सध्या अथियाच्या लग्नाची कोणतीही तयारी नाही.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अथिया शेट्टी आणि केएल राहुल येत्या तीन महिन्यांत लग्न करणार असल्याच्या बातम्या आल्या होत्या, परंतु दोन्ही बाजूंनी कोणतीही तारीख निश्चित करण्यात आलेली नाही. खरं तर, राहुलच्या आई-वडिलांनी नुकतीच मुंबईत अथियाच्या पालकांची भेट घेतली होती. त्यामुळे दोघांच्या लग्नाची अफवा उडाली. या नात्याबद्दल दोघांचे कुटुंबीय सहमत आहेत. सुनील शेट्टीला त्याच्या मुलीच्या निवडीबद्दल आधीच माहिती आहे.
दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
हेही वाचा