Friday, April 19, 2024

हजारो लोकांसमोर ‘भाईजान’ सलमानच्या डोळ्यात आलं पाणी, सुनील शेट्टी आहे कारण, वाचा सविस्तर

बॉलिवूडमध्ये ३ दशकांहून अधिक काळ राज्य करणाऱ्या सुपरस्टार अभिनेत्यांमध्ये सलमान खान याचे नाव येते. सलमानने  त्याच्या कारकीर्दीतील ३०हून अधिक वर्षांच्या काळात अनेक चढ- उतार पाहिले आहेत. सिनेमात तो भलेही रडताना दिसला असेल, पण आतापर्यंत कधीच सार्वजनिक ठिकाणी परफॉर्म करताना त्याचे डोळे पाणावले नव्हते. मात्र, आयफा पुरस्कार सोहळ्यात (आयफा अवॉर्ड्स) असे काय झाले की, सलमानच्या डोळ्यात पाणी आले आणि सर्वांसमोर त्याने एका व्यक्तीला कडकडीत मिठी मारली.

आयफा पुरस्कार २०२२मध्ये सलमान खान झाला भावूक
सलमान खान यंदा आयफा पुरस्कार २०२२ (IIFA Awards 2022) होस्ट करताना दिसणार आहे. २ आठवड्यांपूर्वीच हा पुरस्कार सोहळा अबू धाबी येथे पार पडला होता आणि लवकरच आता हा सोहळा टेलिकास्ट करण्यात येणार आहे. सध्या खास व्हिडिओ क्लिप्समधून या सोहळ्याची झलक दाखवली जात आहे. आयफाने त्यांच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. यामध्ये सलमान खान (Salman Khan) खूपच भावूक झाल्याचे दिसत आहे.

खरं तर या व्हिडिओत रितेश देशमुख (Riteish Deshmukh) सलमानला विचारतो की, तुमच्या आयुष्यातील सर्वात यादगार क्षण कोणता आहे? या प्रश्नाचे उत्तर देताना सलमान एक किस्सा सांगतो, जेव्हा त्याच्याकडे पैसे नसायचे. तसेच, तो ब्रँडेड शर्ट विकत घेऊ शकत नव्हता. त्यावेळी सुनील शेट्टीचे ब्रँडेड दुकान होते. जेव्हा तो या दुकानात पोहोचला, तेव्हा त्याला काही कपडे आवडले. मात्र, त्यावेळी त्याच्याकडे पैसे नव्हते, तेव्हा सुनील शेट्टीने सलमानला त्याचे आवडते कपडे फ्रीमध्ये दिले होते. सलमानने हा किस्सा सांगताच त्याचे डोळे पाणावले. तो सोहळ्यात पहिल्या रांगेत बसलेल्या सुनील शेट्टी याचा मुलगा अहान शेट्टी याच्या जवळ गेला आणि त्याला कडकडून मिठी मारली.

 

View this post on Instagram

 

A post shared by IIFA Awards (@iifa) 

बाहेरून कडक आणि आतून नरम आहे सलमान
या सोहळ्यात सलमानकडून हे ऐकून समजले की, तो बाहेरून कितीही कडक दिसत असला, तरीही आतमधून तो खूपच नरम आहे. तो आपली मदत करणाऱ्या व्यक्तींना कधीच विसरत नाही. तसेच, गरजूंच्या मदतीसाठी नेहमीच उभा राहतो.

सलमान खानने त्याच्या कारकीर्दीत आतापर्यंत १००हून अधिक सिनेमात काम केले आहे. १९८८ साली आलेल्या ‘बिवी हो तो ऐसी’ या सिनेमात सहाय्यक अभिनेता म्हणून त्याने पदार्पण केले होते. मात्र, पुढील वर्षी ‘मैंने प्यार किया’ या सिनेमात त्याने मुख्य भूमिका साकारली. त्यानंतर तो अवघ्या भारतीय सिनेसृष्टीतील रोमँटिक हिरो बनला.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

हेही वाचा-

हे देखील वाचा