Wednesday, March 12, 2025
Home बॉलीवूड ‘ना लग्न… ना एंगेजमेंट’, ललित मोदींसोबत डेटिंगची घोषणा केल्यानंतर सुष्मिता सेनची पहिली पोस्ट चर्चेत

‘ना लग्न… ना एंगेजमेंट’, ललित मोदींसोबत डेटिंगची घोषणा केल्यानंतर सुष्मिता सेनची पहिली पोस्ट चर्चेत

बॉलिवूड अभिनेत्री सुष्मिता सेन (Sushmita Sen) सध्या तिच्या लव्ह लाईफबद्दल प्रचंड चर्चेत आहे. सुष्मिता सेन प्रसिद्ध उद्योगपती ललित कुमार मोदीला डेट करत आहे. ललित मोदी यांनी त्यांच्या अधिकृत ट्विटर आणि इन्स्टाग्रामच्या माध्यमातून ही माहिती दिली. ललित मोदींच्या या घोषणेपासून दोघेही सोशल मीडियावर चांगलेच चर्चेत आहेत आणि लोक वेगवेगळ्या प्रकारचे मीम्स शेअर करून सुष्मिता आणि ललित मोदींना ट्रोल करत आहेत.

आता या ट्रोलिंग दरम्यान सुष्मिता सेनने तिची पहिली प्रतिक्रिया दिली आहे. सुष्मिताने तिच्या इंस्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे, ज्यामध्ये ती तिच्या दोन्ही मुलींसोबत खूप आनंदी दिसत आहे. या पोस्टमध्ये सुष्मिताने हेही स्पष्ट केले आहे की, तिचे लग्न झालेले नाही आणि साखरपुडाही झालेला नाही. अभिनेत्रीने असेही सांगितले की, तिने बरेच स्पष्टीकरण दिले आहे पण आता नाही! (sushmita sen first reaction on relationship with lalit modi)

मुलींसोबतच्या आनंदाच्या क्षणाचा फोटो शेअर करताना अभिनेत्रीने लिहिले की, “मी आनंदी ठिकाणी आहे…ना लग्न…ना साखरपुडा. जे माझ्यावर बिनशर्त प्रेम करतात त्यांच्यासोबत मी आहे. बरेच स्पष्टीकरण दिले … आता पुन्हा जीवन आणि कार्याकडे परतले. माझ्या आनंदाचा भाग झाल्याबद्दल धन्यवाद आणि जे झाले नाहीत, त्यांचा काय फरक पडत नाही. आय लव्ह यू फ्रेंड्स.” सुष्मिताची ही इन्स्टा पोस्ट सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल होत आहे.

अशा प्रकारे ललित मोदींनी केली प्रेमाची घोषणा…
खरंतर, १४ जुलै रोजी ललितने त्यांच्या ट्विटर अकाउंटवर दोन ट्वीट केले होते. पहिल्या ट्वीटमध्ये ललित मोदींनी लिहिले की, “परिवारासह मालदीव, सार्डिनिया टूर संपवून लंडनला परतलो. माझ्या बेटर हाफ सुष्मिता सेनसोबत एक नवीन सुरुवात..शेवटी एक नवीन आयुष्य. आज मी चंद्रावर आहे.” ललितच्या या ट्विटनंतर लोकांना वाटले की दोघांचे लग्न झाले आहे. मात्र, या ट्विटनंतर ललितने त्याच्या अधिकृत ट्विटरवरील आणखी एका ट्विटमध्ये स्पष्ट केले की, त्यांनी लग्न केले नसून दोघेही एकमेकांना डेट करत आहेत.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा

हे देखील वाचा