Friday, March 14, 2025
Home बॉलीवूड ‘तु सुखात रहा…’ सुष्मिता सेनच्या नव्या प्रेमप्रकरणावर एक्स बॉयफ्रेंडने पहिल्यांदाच दिली प्रतिक्रिया

‘तु सुखात रहा…’ सुष्मिता सेनच्या नव्या प्रेमप्रकरणावर एक्स बॉयफ्रेंडने पहिल्यांदाच दिली प्रतिक्रिया

सध्या सिने जगतात सुष्मिता सेन आणि ललित मोदी यांच्या प्रेमप्रकरणाची जोरदार चर्चा सुरू आहे. सुष्मिता सेनने ललित मोदींसोबत आपले नवे नाते सुरू केले आहे. ललित मोदींनी सोशल मीडियावर आपल्या नात्याचा खुलासा करताच लोकांच्या कमेंट्सचा महापूर आला होता. सुष्मिता आणि ललित मोदी यांचे हे नाते अनेकांना आवडले नसले तरी अनेकांनी अभिनेत्रीच्या या कृतीचे कौतुक केले आहे. अनेकजण याला मूर्खपणा म्हणत आहेत, तर सुष्मिताचे चाहतेही तितकेच दु:खी झाले आहेत. या सगळ्यामध्ये सुष्मिता सेनचा एक्स बॉयफ्रेंड रोहमन शॉलची प्रतिक्रियाही आली आहे. तर या नात्याबद्दल रोहमनचे काय मत आहे जाणून घेऊ या. 

ललित मोदींनी गुरुवारी संध्याकाळी सोशल मीडियावर सुष्मिता सेनसोबतचे फोटो अपलोड करून आपले प्रेम व्यक्त केले होते. जरी आधी लोकांना वाटत होते की दोघांनी लग्न केले आहे. परंतु नंतर त्यांनी स्पष्ट केले की ते फक्त डेट करत आहेत. यानंतर शुक्रवारी सुष्मिता सेनची प्रतिक्रियाही आली. आता यावर सुष्मिताचा एक्स बॉयफ्रेंड रोहमन शॉलचीही प्रतिक्रिया आली आहे. सुष्मिताच्या एक्स रोहमनसाठी ही धक्कादायक बातमी नाही.

एका मुलाखतीदरम्यान रोहमनने सुष्मिताच्या नात्याबद्दल “प्रेम सुंदर आहे, त्यामुळे त्यांना आनंदी राहू द्या. मला इतके माहित आहे की जर तिने एखाद्याला निवडले असेल तर तो त्यास पात्र आहे. याशिवाय रोहमनने जर तुम्हाला एखाद्यावर हसण्याने आराम मिळत असेल तर हसा, अशी प्रतिक्रिया दिली आहे. ललितला त्याच्या एक्स गर्लफ्रेंडसोबत पाहून रोहमनला वाईट वाटत नाही. रोहमन शॉल आणि सुष्मिता सेनचे गेल्या वर्षी ब्रेकअप झाले होते. दोघे 2018 पासून एकमेकांना डेट करत होते. रोहमन सुष्मितापेक्षा 16 वर्षांनी लहान आहे. सुष्मिता सेन केवळ रोहमन आणि ललित मोदीसोबतच रिलेशनशिपमध्ये नाही तर याआधीही तिने अनेक लोकांना डेट केले आहे.

हे देखील वाचा