Friday, April 19, 2024

बाबो! चक्क दोरीने बनवलीय उर्फी जावेदची ब्रालेट, बघून युजर्सने केला विचित्र कमेंट्सचा वर्षाव!

‘बिग बॉस ओटीटी’ फेम उर्फी ​​जावेद (Urfi Javed) तिच्या विचित्र फॅशन सेन्ससाठी ओळखली जाते. ती तिच्या रंगीबेरंगी पोशाखांमध्ये फोटो आणि व्हिडिओ शेअर करत असते. याशिवाय ती सार्वजनिक ठिकाणी तिचा ड्रेस फ्लॉंट करताना दिसत आहे. कधी कधी ती स्वतःच ड्रेस डिझाइन करते. आता उर्फीने एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये ती गुलाबी रंगाच्या ब्रालेटसह निळ्या जीन्समध्ये दिसत आहे. तिचे हे ब्रालेट चक्क दोरीपासून बनवलेले आहे.

व्हिडिओमध्ये उर्फी गाण्याच्या तालावर नाचत आहे. तिने या आउटफिटसोबत हाय पोनीटेल बांधली आहे. तिच्या चेहऱ्याच्या दोन्ही बाजूला केसांच्या बटा हवेशी खेळत आहेत. यासोबत उर्फीने कॅप्शनमध्ये लिहिले, “मला हे चॅलेंज करायचेच होते, कारण हे माझे आवडते गाणे आहे.” (urfi javed flaunted pink bralette users said looks like a mosquito coil)

खालील लिंकवर क्लिक करून पाहा व्हिडिओ:

https://www.instagram.com/reel/CgBVtGqlSs7/?utm_source=ig_embed&ig_rid=0e31c1a8-0e4b-4bd5-8857-d2403732d0a6

युजर्सच्या कमेंट्स
उर्फीच्या या व्हिडिओवर एका युजरने म्हटले की, ‘आउटफिटची रचना जलेबीपासून प्रेरित आहे.’ एकाने लिहिले, ‘ही तर मच्छर वाली अगरबत्ती आहे’. ‘तुम्ही मॉर्टिन मच्छर अगरबत्ती ब्रँड एंबेसेडर बनू शकता’ असेही एका युजरने लिहीले आहे.

रणवीर सिंगने केले कौतुक
उर्फीला सोशल मीडियावर नेहमी ट्रोल केले जाते. अनेक कलाकारांनी तिच्या फॅशन सेंसवर निशाना साधला आहे. दरम्यान, अलीकडेच रणवीर सिंगने (Ranveer Singh) ‘कॉफी विथ करण’ (Koffee With Karan) या शोमध्ये उर्फीचे कौतुक केले आणि तिला फॅशन आयकॉन म्हटले.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा

हे देखील वाचा