Sunday, June 22, 2025
Home साऊथ सिनेमा आर माधवनचा मुलगा वेदांतने पुन्हा रोशन केले वडिलांचे नाव, स्वीमिंगमध्ये केला नवा राष्ट्रीय विक्रम

आर माधवनचा मुलगा वेदांतने पुन्हा रोशन केले वडिलांचे नाव, स्वीमिंगमध्ये केला नवा राष्ट्रीय विक्रम

अभिनेता आर माधवन (R Madhavan) सध्या त्याच्या ‘रॉकेटरी: द नंबी इफेक्ट’ या चित्रपटाला मिळालेल्या प्रशंसामुळे खूप आनंदी आहे. दरम्यान, त्याच्या आनंदाची बातमी आता दुप्पट झाली आहे. खरंतर, त्याच्या मुलाने पोहण्यात असा पराक्रम केला आहे, ज्यामुळे अभिनेत्याला खूप आनंद आणि अभिमान वाटत आहे. त्याने रविवारी (१७ जुलै) सोशल मीडियावर एक व्हिडिओ पोस्ट करून, ही आनंदाची बातमी चाहत्यांसोबत शेअर केली. 

वेदांतने केली कमाल!
हा व्हिडिओ त्याचा जलतरणपटू मुलगा वेदांत माधवनचा आहे. त्याने अलीकडेच ४८व्या ज्युनियर नॅशनल एक्वाटिक चॅम्पियनशिपमध्ये राष्ट्रीय ज्युनियर विक्रम मोडला. आपल्या मुलाच्या या कामगिरीने खूश झालेल्या अभिनेत्याने ट्विटरवर एक व्हिडिओ पोस्ट करून लोकांना ही माहिती दिली आहे. व्हिडिओमध्ये, वेदांत पोहताना दिसत आहे. असे म्हणता येईल की सुमारे १६ मिनिटांत त्याने अद्वैत पेजचा ७८० मीटरचा विक्रम मोडला आहे. व्हिडिओ शेअर करताना, माधवनने पोस्टला कॅप्शन दिले, “कधीही नाही म्हणू नका… १५०० मीटर फ्रीस्टाइलचा राष्ट्रीय ज्युनियर विक्रम मोडला.” (vedaant madhavan broke national junior swimming record)

चाहते करतायेत अभिनंदन
त्याच्या पोस्टला प्रतिक्रिया देताना एका चाहत्याने म्हटले की, “धन्य ते आई-वडील जे आपल्या मुलांसाठी या जगात ओळखले जातात.. तुम्ही त्यांच्यापैकी एक आहात सर.” आणखी एका युजरने कमेंट केली, “तुम्हा दोघांचे अभिनंदन. एक वडील म्हणून तुम्हाला मुलाच्या कर्तृत्वाचा अभिमान वाटला पाहिजे आणि मुलगा म्हणून वेदांतने वडिलांचा अभिमान बाळगला आणि तुम्ही दोघांनी मिळून भारताचा गौरव केला.”
नुकतेच जिंकले होते सुवर्णपदक
एप्रिलमध्ये, वेदांतने कोपनहेगनमधील डॅनिश ओपनमध्ये पुरुषांच्या ८०० मीटर फ्रीस्टाइलमध्ये सुवर्णपदक जिंकले. सुवर्णपदक जिंकल्यानंतर अनेक सेलिब्रिटींनी माधवनचे जोरदार कौतुक केले. त्या सेलिब्रिटींमध्ये प्रियांका चोप्रा आणि कंगना रणौत यांचा समावेश होता. वेदांतने पदक जिंकल्याची क्लिप शेअर करत माधवनने ट्विट करून आपला आनंद व्यक्त केला होता.

हे देखील वाचा