Monday, June 23, 2025
Home मराठी अभ्या आणि लतीचा होणार मृत्यू? ‘सुंदरा मनामध्ये भरली’ मालिकेला येणार मोठे वळण

अभ्या आणि लतीचा होणार मृत्यू? ‘सुंदरा मनामध्ये भरली’ मालिकेला येणार मोठे वळण

कलर्स मराठीवरील ‘सुंदरा मनामध्ये भरली’ ही मालिका चांगलीच चर्चेत आहे. मालिकेत अनेक सकारात्मक आणि नकारात्मक ट्रॅक आले. परंतु प्रेक्षकांनी या मालिकेला भरभरून प्रतिसाद दिला आहे. मालिकेची कहाणी काही वेगळी असल्याने प्रेक्षकांना देखील कहाणी आणि गवकडचा रांगडा बाज आवडत आहे. अशातच मालिकेत काहीतरी चांगलं घडत होतं त्यात पुन्हा एकदा या मालिकेत एक मोठा ट्विस्ट येताना दिसणार आहे. या मराठी मालिकेत अक्षया नाईक आणि समीर परांजपे मुख्य भूमिकेत आहे.

मालिकेत अभिमन्यू आणि लतिकाचा मोठा अपघात दाखवला जाणार आहे. याआधी दौलतने त्यांना फसवून त्यांची जमीन आणि घर हडप केले होते. यावर अभिमन्यूने चांगली आयडिया करून त्यांचे घर आणि जमीन सोडवून आणली होती. त्याने स्त्री वेष धारण करून दौलतला त्याच्या जाळ्यात फसवले होते. परंतु आता दौलत आणि आबांना त्याचे हे सत्य समजल्यामुळे ते दोघेही त्याला मारण्यासाठी सज्ज झाले आहे. (sundara manamdhe bharaliA bigg twist coming in sundara manamadhye bharali serial)

लतिका आणि अभिमन्यू देवदर्शनाला जात असताना दौलतची माणसं त्यांचा अपघात घडवून आणला आहे. त्यामुळे लतिका आणि अभिमन्यूचा मृत्यू देखील होऊ शकतो. नुकतेच या मलिकचा प्रोमो समोर आला आहे. प्रोमो पाहता आता मालिकेत खूप मोठे वळण येणार आहे. असे दिसत आहे. त्यामुळे मालिकेत येणाऱ्या भागात काय होणार आहे? हे पाहण्यासाठी प्रेक्षक खूप उत्सुक आहेत.

हेही वाचा :

हे देखील वाचा