Monday, June 17, 2024

सलमानचा बॉडीगार्ड शेराच्या आईला शिवीगाळ..,सोसायटीतील सदस्याविरोधात तक्रार दाखल

अभिनेता सलमान खानचा बॉडीगार्ड शेराच्या आईला सोसायटीतील काही सदस्यांनी शिवीगाळ केल्याचा आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणी शेराने त्याच्या सोसायटीतील एका सदस्याविरुद्ध तक्रार दाखल केली आहे. शेराने आईच्या वतीने मुंबईतील अंधेरी येथील मनीष नगर येथील इमारतीच्या सचिवाविरुद्ध डीएन नगर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. शेराची आई प्रीतम कौर जॉली यांनी आरोप केला आहे की, सोसायटीचे सदस्य जयंती लाल पटेल तिची बदनामी करत आहेत आणि असभ्य भाषा वापरत आहेत.

तक्रारीत असे म्हटले आहे की, प्रीतम कौर (शेराची आई) यांच्या निवेदनानुसार जयंतीलाल पटेल यांनी तिची प्रतिमा डागाळण्यासाठी अपमानास्पद भाषा वापरली. याशिवाय ही घटना त्यांच्या पतीच्या उपस्थितीत सहकारी गृहनिर्माण संस्थेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत घडली. पटेल यांनी शेराच्या आईला उद्देशून असभ्य टिप्पणी केल्याचा आरोप त्यांनी केला आहे.

जयंतीलाल यांनी प्रीतम कौरला सांगितले की, ‘तु स्वतःला कोण समजते? आता एजीएममध्ये बघ (वार्षिक सोसायटी बैठक), मी तुला सगळ्यांसमोर कसं उघडं पाडतो.’ जयंतीलाल सोसायटी सदस्यांना सांगत आहेत की शेराच्या आईने सोसायटीच्या विरोधात सोसायटी रजिस्ट्रार ऑफिसमध्ये अन्यायकारक तक्रार केली आहे. शेरा यांनी सांगितले की, ते त्यांच्या आईला न्याय मिळवून देण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार आहेत. त्यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेण्याचे आवाहन पोलिसांना केले आहे.

शेर माध्यमांशी बोलताना म्हणाला की, “गेली 50 वर्षांपासून आम्ही आशिष को-ऑपरेटिव्ह हाउसिंग सोसायटीमध्ये राहत आहोत. काही वर्षांपूर्वी मी कामानिमित्त ओशिवरा येथे राहायला गेलो. माझे आई वडील माझ्या मुलासोबत आमच्या जुन्या घरी राहत होते. मम्मी सोसायटीचे अध्यक्ष तर जयंतीलाल सचिव होते. इमारतीच्या नूतनीकरणाचे काम 2016 मध्ये सुरू झाले आणि जयंतीलाल पटेल यांनी सांगितले की, ते 60 लाख रुपयांमध्ये पूर्ण होईल. परंतु, हे काम पूर्ण होण्यासाठी 100 लाख रुपये खर्च आला. यामुळे शेराच्या आईने 2021 मध्ये सोसायटीच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला.

यानंतर, जयंतीलाल पटेल यांनी शेराच्या आईविरुद्ध सोसायटीतील इतर 13 सदस्यांसह तक्रार दाखल केली. त्यांनी शेराच्या आईवर सोसायटीच्या पैशांचा गैरवापर केल्याचा आरोप केला. शेराने सांगितले की, या तक्रारीमुळे त्याच्या आईला खूप मानसिक त्रास झाला आहे. त्यांनी पोलिसांना या प्रकरणाची गंभीर दखल घेण्याचे आवाहन केले आहे. (A complaint has been filed against a member of the society for abusing Salman bodyguard Shera mother)

आधिक वाचा-
आयुष्यात पहिल्यांदाच १५०० रुपये पाहून कादर खान यांचे थरथर कापत होते हात-पाय; डोळ्यांवर नव्हता बसत विश्वास
एवढ्यात तर आपलं आयुष्य जाईल राव! ‘रामायण’ चित्रपटासाठी यशने घेतले तब्बल ‘एवढे’ कोटी

हे देखील वाचा