Monday, July 15, 2024

अर्रर्रर्र खतरनाक ! प्रवीण तरडेची साऊथमध्ये दमदार एन्ट्री; म्हणाला, ‘भारतातील आख्खा मार्केट…’

अभिनय, निर्मिती, दिग्दर्शन, लेखन असे विविध पैलू असणारा अभिनेता म्हणजे प्रवीण तरडे प्रवीण तरडे. त्यांनी मराठी चित्रपटसृष्टीमध्ये अनेक चित्रपटांमध्ये काम करून त्याची वेगळी अशी अभिनय शैली निर्माण केलेली आहे. सगळ्या प्रेक्षकांना देखील त्यांचा अभिनय खूप आवडतो. मराठीमध्ये हात आजमावल्यावर प्रवीण तरडे यांनी आता दक्षिणात्य चित्रपट सृष्टीमध्ये पदार्पण केलेले आहे. आणि या संदर्भातीलच instagram वर एक पोस्ट देखील शेअर केलेली आहे. दक्षिणाच्या चित्रपटसृष्टीमध्ये प्रमुख खलनायक म्हणून काम करणार असल्याची माहिती देखील त्यांनी सांगितलेली आहे.

प्रवीण तरडे यांनी सोशल मीडियावर त्यांच्या आगामी दक्षिणात्य चित्रपटातील पोस्टर शेअर केलेला आहे. या चित्रपटाचे नाव ‘अहो विक्रमार्का असे दिसत आहे. या फोटोमध्ये ते विलन असल्याचे स्पष्ट दिसत आहे. ही पोस्ट शेअर करून त्यांनी लिहिलेले आहे की, “दक्षिणात्य चित्रपटसृष्टीत मुख्य खलनायक म्हणून माझा प्रवेश…अहो विक्रमार्कामध्ये असुरा बनवून मी येतोय तुमच्या भेटीला मराठी बरोबर भारतातल्या सहा भाषां बरोबर… अख्या भारतात मार्केट आता आपलं आहे.”

प्रवीण तरडे यांनी केलेल्या पोस्टवरून हे समजत आहे की, त्यांचा अहो विक्रमार्क हा चित्रपट मराठी भाषेत सुद्धा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. आणि या चित्रपटात तो असुरा हे पात्र साकारणार आहे. आता प्रवीण तरडेचा दाक्षिणातील चित्रपट सृष्टीमधील हे पदार्पण नक्की कसे असणार आहे? यामधील त्याची भूमिका नक्की कशी असणार आहे? याबद्दल सगळ्यांच्या मनात उत्सुकता निर्माण झालेली आहे.

त्यांनी शेअर केलेल्या या पोस्टवर अनेक लोक कमेंट करून त्यांचे कौतुक करत आहे. चाहतेत अभिनेत्याचे अभिनंदन देखील करत आहे. आता प्रवीण तरडेचा हा चित्रपट नक्की कधी प्रदर्शित होणार आहे याबद्दलची माहिती अद्याप तरी समोर आलेली नाही. तरी देखील प्रेक्षकांच्या मनात हा चित्रपट पाहण्याची खूप उत्सुकता निर्माण झालेली आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा-

वादग्रस्त विधानांमुळे स्वराला चित्रपटांमध्ये कमी संधी मिळाली; म्हणाली, ‘मेकर्स वाईट बोलू लागले…’
‘फादर्स डे’च्या निमित्ताने वरून धवनने केला मुलीचा पहिला फोटो शेअर; एकदा पाहाच

हे देखील वाचा