Monday, July 1, 2024

कोंकनाची पोस्ट पाहून युजरने केला वाढत्या वयावर प्रश्न उपस्थित; अभिनेत्रीने अतिशय मजेदार अंदाजात दिलं त्याला उत्तर

बॉलिवूड अभिनेत्री कोंकना सेनला तिच्या प्रभावी अभिनयामुळे ओळखले जाते. जास्त चित्रपट न करता सुद्धा कोंकना सेनने आजपर्यंत दोन राष्ट्रीय पुरस्कार मिळवले आहेत. कोंकना सेन नेहमीच सोशल मीडियावर सक्रिय असते. यावेळी कोंकना सेन तिच्या पोस्टमुळे चर्चेत आली आहे. एका युजरने तिच्या वाढत्या वयावरून नाराजी व्यक्त केली. तेव्हा कोंकना सेनने त्यावर खूप मजेशीर उत्तर दिलं.

कोंकनाने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर तिच्या पाळीव कुत्र्यासोबतचे फोटो शेअर केले. या फोटोमध्ये कोंकना मेकअप न करता दिसत आहे. तिने पांढऱ्या रंगाचा शर्ट आणि डेनिम शॉर्ट्स घातली आहे. तिने या पोस्टवरून सांगितले की, “मागच्या लॉकडाऊनमध्ये या कुत्र्याला मी दत्तक घेतले होते. हा माझा पहिला पाळीव प्राणी आहे.” तिने कुत्र्याच्या प्रशिक्षणावर आनंद व्यक्त केला. तिच्या या पोस्टला तिचे चाहते खूप लाईक करत आहेत. खूप जणांनी तर तिच्या या कामाचे कौतुक सुद्धा केले.

याच दरम्यान एका चाहत्याने कोंकना चा फोटो पाहून तिच्या वयावरून नाराजी व्यक्त केली. तालिब अली नावाच्या या चाहत्याने कमेंटमध्ये असे लिहिले की, “तुमचं वाढत वय पाहून खूप दुःख झालं. तुमच्या सारख्या चांगल्या कलाकारासोबत चित्रपटसृष्टीने न्याय केला नाही. शालेय जीवनात तुम्ही माझी क्रश होतात. मी तुम्हाला एक थी डायन नंतर अजून पाहण्यास उत्सुक होतो, तुम्ही खूप अमेझिंग आहात.”

चाहत्यांच्या या प्रश्नावर कोंकनाने खूप मजेशीर उत्तर दिले, “ओह…दुःखी होऊ नकोस, कमी वयात मरण येणे यापेक्षा चांगले आहे वय वाढणे.” कोंकना सेनचे चाहते तिला चित्रपटात पाहण्यास खूप उत्सुक आहेत. ते तिला नविन चित्रपट करण्याची इच्छा व्यक्त करत आहेत.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-जिया खान आत्महत्या प्रकरणाची धुरा विशेष सीबीआयच्या हातात; सूरज पांचोली म्हणाला, ‘…मला शिक्षा झालीच पाहिजे’

-करिश्मासोबत नाते तोडून अभिषेकने का केले तीन वर्षांनी मोठी असणाऱ्या ऐश्वर्यासोबत लग्न? कारण ऐकून व्हाल हैराण

-लाजुन लाल झाला शाहिद कपूर, जेव्हा मीराने शेअर केले बेडरूम सिक्रेट; म्हणाली, ‘मला वाटतं तो कंट्रोल…’

हे देखील वाचा