Friday, December 8, 2023

शाहरूख खानला भेटण्यासाठी फॅनने केले ‘असे’ कृत्य; अभिनेता म्हणाला, ‘मला आधी…’

बाॅलिवूडचा किंग खान म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शाहरूख खानचा प्रचंड मोठा चाहता वर्ग आहे. शाहरूख खानचे चाहते त्याची एक झलक पाहण्यासाठी काहीही करण्यास तयार असतात. शाहरूख खानचा गेल्या काही महिन्यांपूर्वी पठान हा चित्रपट प्रदर्शित झाला. हा चित्रपट प्रचंड गाजला. आता सध्या शाहरूख खान त्याच्या जवान चित्रपटामुळे चर्चेत आला आहे. शाहरूख खानच्या पठान चित्रपटाची सध्या चांगलीच चर्चा रंगली आहे. हा चित्रफट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

जवान (Jawan) चित्रपटाचा नुकताच ट्रेलर रिलीझ झाला आहे. या चित्रपटाची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. या चित्रपटाचा ट्रेलर पाहिल्यानंतर हा चित्रपट पाहण्याची उसुक्ता वाढली आहे. किंग खान आणि निर्माते संपूर्ण भारतात रिलीज होणाऱ्या सामूहिक मनोरंजन चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये कोणतीही कसर सोडत नाहीत.

‘जवान’च्या रिलीजला आता फक्त एक आठवडा बाकी आहे, त्यामुळे चेन्नईतील भव्य कार्यक्रमात सहभागी झाल्यानंतर नुकताच शाहरुख खान (ShahRukh Khan) चित्रपटाच्या ट्रेलर लॉन्च कार्यक्रमासाठी दुबईतील बुर्ज खलिफा येथे पोहोचला. जिथे त्याच्या ‘जवान’चा ट्रेलर प्रदर्शित झाला. यादरम्यान बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खान चाहत्यांशी मनमोकळेपणाने बोलला. या कार्यक्रमादरम्यान शाहरुख खानच्या एका चाहत्याने किंग खानला भेटण्यासाठी बुर्ज खलिफामध्ये संपूर्ण रेस्टॉरंट बुक केले.

बुर्ज खलिफा येथील कार्यक्रमाचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. ज्यात शाहरुख खान भव्य ट्रेलर लॉन्चच्या वेळी चाहत्यांशी संवाद साधताना दिसत आहे. बॉलीवूडचा बादशाह साइन इन करणार असताना, अँकरने त्याला सांगितले की, एका चाहत्याने आणि त्याच्या कुटुंबाने शाहरूखला भेटण्यासाठी बुर्ज खलिफा येथे संपूर्ण रेस्टॉरंट बुक केले आहे.

शाहरुख खानला त्याच्या चाहत्याचा हा हावभाव खूप आवडला. किंग खानने उत्तर दिले, “जेवण तयार ठेवा, मी येतोय तिथे. सोबतच ओला टॉवेल ठेव, मला आधी स्वतःला स्वच्छ करावे लागेल, प्लीज, कारण या लाल जॅकेटमध्ये खूप गरम आहे.” त्यामुळे शाहरूख खान चर्चेत आला आहे.

अधिक वाचा-
अभिनयाच्या जोरावर राम कपूरने मिळवली प्रेक्षकांच्या मनात जागा, ‘या’ मालिकेने दिली खास ओळख
‘ड्रिम गर्ल 2’च्या मोहिनी पुढे बाकी सर्व फिकचं! आयुष्मानच्या सिनेमानं कमावले ‘इतके’ कोटी

हे देखील वाचा