Friday, December 8, 2023

‘ड्रिम गर्ल 2’च्या मोहिनी पुढे बाकी सर्व फिकचं! आयुष्मानच्या सिनेमानं कमावले ‘इतके’ कोटी

अक्षय कुमार आणि आयुष्मान खुराना यांचे चित्रपट सनी देओलच्या ‘गदर 2‘ चित्रपटाच्या वादळात धमाल करताना दिसत आहेत. ‘गदर 2‘ने तुफाम कमाई केली आहे. ताज्या अहवालांनुसार, ‘गदर 2’ने 21व्या दिवशी बॉक्स ऑफिसवर 7.50 कोटी रुपयांची कमाई केली आहे. त्यानंतर सनी देओलच्या चित्रपटाचे एकूण कलेक्शन 481.85 कोटींवर पोहोचले आहे. पण ‘ड्रीम गर्ल 2’ या चित्रपटाने ‘गदर 2‘ लाही स्पर्धा दिली आहे.आता या चित्रपटाचे आठव्या दिवसाचे कलेक्शन समोर आले आहे.

ड्रीम गर्ल 2‘ (Dream Girl 2) मध्ये आयुष्मान खुराना पूजाच्या भूमिकेने सर्वांची मने जिंकत आहे. या चित्रपटाने रक्षाबंधनाच्या दिवशीही चांगले कलेक्शन केले आहे. आता गुरुवारी विशेष काही कमावता आले नाही. ‘ड्रीम गर्ल 2’ने आठव्या दिवशी खूपच कमी कमाई केली आहे. माध्यमातील रिपोर्टनुसार, ‘ड्रीम गर्ल 2’ने आठव्या दिवशी सुमारे 4 कोटी कमावले आहेत. त्यानंतर एकूण संकलन 71 कोटी झाले आहे.

ड्रीम गर्ल 2 ने पहिल्या दिवशी 10.69 कोटी, दुसऱ्या दिवशी 14 कोटी, तिसऱ्या दिवशी 16 कोटी, चौथ्या दिवशी 5.42 कोटी, पाचव्या दिवशी 5.87 कोटी, सहाव्या दिवशी 7.5 कोटी आणि सातव्या दिवशी 7.50 कोटी कमावले. चित्रपटाला 100 कोटींच्या क्लबमध्ये येण्यासाठी वेळ लागेल. मात्र, वीकेंडला चांगली कमाई करून हा चित्रपट 100 कोटींचा आकडा पार करू शकतो.

‘ड्रीम गर्ल 2’ बद्दल बोलायचे तर, हा 2019 च्या चित्रपटाचा सिक्वेल आहे. ‘ड्रीम गर्ल’मध्ये आयुष्मान खुरानासोबत नुसरत भरुचा मुख्य भूमिकेत दिसली होती. यावेळी तिच्या जागी आयुष्मानसोबत अनन्या पांडे मुख्य भूमिकेत दिसत आहे. अनन्या आपल्या अभिनयाने लोकांना प्रभावित करण्यात यशस्वी ठरली आहे. ड्रीम गर्ल 2 चे दिग्दर्शन राज शांडिल्य यांनी केले आहे. चित्रपटात आयुष्मान आणि अनन्यासोबत परेश रावल, राजपाल यादव, विजय राज, मनजोत सिंग. अन्नू कपूरसह अनेक कलाकार यात महत्त्वाच्या भूमिका साकारताना दिसले आहेत. (Ayushmann Khurrana film Dream Girl 2 earned so many crores)

अधिक वाचा-
टूथपेस्टच्या जाहिरातीनंतर बदलले राकेश बापटचे करिअर, पुढे मिळाली खास ओळख
अभिनयाच्या जोरावर राम कपूरने मिळवली प्रेक्षकांच्या मनात जागा, ‘या’ मालिकेने दिली खास ओळख

हे देखील वाचा