Saturday, June 29, 2024

Shocking! प्रसिद्ध अभिनेत्याच्या घराला लागली भीषण आग; घरात अडकलेली महिला गभीर जखमी तर…

मनोंरंजन विश्वातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. अहमदनगर येथील दिवंगत अभिनेते सदाशिव अमरापूरकर (Actor Sadashiv Amarapurkar) यांच्या घराला बुधवारी आग लागली. ही आग शॉर्टसर्किटमुळे लागली असल्याची माहिती समोर आली आहे. आग लागल्याची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या जवानांनी तातडीने घटनास्थळ धाव घेतली. त्यानंत आग आटोक्यात आणली.

या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. आग लागलेल्या फ्लॅटमध्ये सदाशिव अमरापूरकर (Sadashiv Amarapurkar house fire) यांची पत्नी सुनंदा अमरापूरकर आणि भाडेकरू ज्योती भोर राहत होत्या. आग लागली तेव्हा सुनंदा अमरापूरकर घरात नव्हत्या. मात्र, ज्योती भोर घरातच होत्या. त्यांना अग्निशमन दलाच्या जवानांनी आग लागलेल्या घरातून बाहेर काढलं. या घटनेत ज्योती यांना किरकोळ दुखापत झाली आहे. त्यांना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, ज्योती भोर यांनी सांगितले की, तेव्हा ते घराच्या स्वयंपाकघरात काम करत होत्या. अचानक त्यांना स्वयंपाकघरातून धूर येताना दिसला. त्यांनी तात्काळ बाहेर पडण्याचा प्रयत्न केला. पण बाहेर पडताना त्यांना पाय घसरून पडले. त्यावेळी त्यांना किरकोळ दुखापत झाली.

आग लागलेल्या फ्लॅटमध्ये काही घरगुती वस्तू जळून खाक झाल्या आहेत. मात्र, फ्लॅटाचे मोठे नुकसान झालेले नाही.या घटनेमुळे अहमदनगर शहरात खळबळ उडाली आहे. दिवंगत अभिनेते सदाशिव अमरापूरकर यांच्या घराला आग लागल्याची बातमी ऐकून अनेक जणांनी त्यांच्या घरी जाऊन पाहणी केली.

सदाशिव अमरापूरकर हे मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीतील एक दिग्गज अभिनेते होते. त्यांनी आपल्या कारकिर्दीत अनेक सुपरहिट चित्रपटांमध्ये काम (Sadashiv Amarapurkar movies) केले आहे. त्यांनी साकारलेल्या खलनायकांच्या भूमिकांनी त्यांना विशेष लोकप्रियता मिळवून दिली. (Fire breaks out at late actor Sadashiv Amrapurkar Ahmednagar residence)

सदाशिव अमरापूरकर यांनी गोविंद निहलानी यांच्या ‘अर्ध सत्य’ या चित्रपटातून सिनेसृष्टीत पदार्पण केले होते. यानंतर ते जवळपास 60 चित्रपटांमध्ये झळकले. सदाशिव अमरापूरकर यांना फुफ्फुसासंबंधित आजारामुळे 3 नोव्हेंबर 2014 साली अखेरचा श्वास घेतला. (A fire broke out at the house of famous late actor Sadashiv Amarapurkar)

आधिक वाचा-
‘ऍनिमल’नंतर रणबीर कपूर साकारणार रामाची भूमिका, ‘या’ दिवशी होणार शूटिंगला सुरुवात
Santosh Chordia Death | मराठी सिनेसृष्टीने गमावला आणखी एक हूरहुन्नरी कलाकार, संतोष चोरडिया यांचे वयाच्या 57 व्या वर्षी निधन

हे देखील वाचा