बाॅलिवूड इंडस्टीत असे काही चित्रपट झाले आहेत. जे आजही लोकांच्या डोळ्यासमोर जसेच्या तसे उभे राहतात. त्यातीलत एक म्हणजे ‘कुछ कुछ होता है‘ हा चित्रपट होय. हा चित्रपट त्या काळी प्रचंड गाजला होता. हा चित्रपट पाहताना आजही लोकांना कंटाळा येत नाही. या चित्रपटात अभिनेत्री टीनाची भूमिका राणी मुखर्जीने साकारली आहे. तर अंजली म्हणजे आपल्या सर्वांची लाडकी अभिनेत्री काजोल होय. या चित्रपटात शाहरुख खानने राहुलची भूमिका साकारली आहे. या चित्रपटात दिसणाऱ्या या अभिनेत्री बहिणी आहेत. पण तरीही त्या एकमेकींना बोलत नाहीत.
‘कुछ कुछ होता है‘ चित्रपटाचे दिग्दर्शक आणि डिस्ने हॉटस्टार चॅट शो होस्ट करण जोहर यांनी प्रेक्षकांचे भरपूर मनोरंजन केले. करण जोहरचा चॅट शो आजही लोकांना खूप आवडतो. या शो मध्ये अनेक जेष्ठ कलाकार मंडळी येत असतात. नुकतीच या शो मध्ये राणी मुखर्जी (Rani Mukherjee) आणि काजोल आली होती. यावेळी तिने अनेक विषयांवर खुलासे केले. यावेळी बोलताना तिने आणि काजोलनेही त्यांच्या नात्याबद्दल अनेक रंजक खुलासे केले.
करण जोहरने राणी आणि काजोलसमोर सांगितले की, ‘कुछ कुछ होता है’ चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान काजोल आणि राणी एकमेकांशी अजिबात बोलत नव्हत्या. जेव्हा करण जोहरने तिचा हा दृष्टिकोन पाहिला तेव्हा तो देखील गोंधळला, कारण करणला माहित होते की राणी आणि काजोल या बहिणी आहेत. राणीचे वडील राम मुखर्जी आणि काजोलचे वडील शोमू मुखर्जी हे एकमेकांचे भाऊ (चुलत भाऊ) होते. यामुळेच बहिणी एकमेकांशी अजिबात बोलत नाहीत हे करण जोहरला गोंधळात टाकत होते.
ICONS ONLY on #KoffeeWithKaran Season 8 ☕#RaniMukerji #YRFTalent #YRF #KWKS8OnHotstar pic.twitter.com/TV9u3a2E4Q
— YRF Talent (@yrftalent) November 27, 2023
इतकेच नाही तर राणी मुखर्जीने ‘कॉफी विथ करण’मध्ये असेही म्हटले होते की, 2000 मध्ये ती काजोल आणि ऐश्वर्या राय यांच्यात ऐश्वर्याशी जास्त बोलली होती. राणी असेही म्हणाली की, ‘कुछ कुछ होता है’च्या शूटिंगदरम्यान काजोलचा दृष्टिकोन विचित्र वाटत होता. पण आज या दोघांचे नाते पूर्णपणे बदलले आहे. राणी म्हणाली की, त्यांचा एकमेकांशी संवाद नसला तरी तिचे वडील एकमेकांच्या खूप जवळ होते. दोघांनीही वडील गमावल्यावर एकमेकांना आधार दिला. आज दोघांमध्ये चांगले बॉन्डिंग आहे. (Actress Rani Mukherjee and Kojal made a shocking revelation in episode 8 of Karan Johar popular show Koffee With Karan)
आधिक वाचा-
–रेखा यांनी थेट स्टेजवर केला ‘या’ पोस्टरला वाकून नमस्कार; नेटकरी म्हणाले, ‘डोळ्यात पाणी..’
–आलिया भट्टचे यश पाहून क्रिती सेनाॅनला वाटतो हेवा? अभिनेत्री म्हणाली, ‘मला पण इच्छा आहे…’