देशभरात रिलीझ झाल्यानंतरही चर्चेत राहिलेला ‘द काश्मीर फाइल्स’ची क्रेझ अजूनही कमी होताना दिसत नाहीये. चित्रपट पाहिल्यानंतर अनेकांना याचा राग आल्याचे दिसत असतानाच, अनेकजण या चित्रपटाच्या समर्थनार्थ मत मांडताना दिसत आहेत. दरम्यान, या चित्रपटाशी संबंधित एक हृदयद्रावक प्रकरण समोर आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी (२७ मार्च) हा चित्रपट पाहिल्यानंतर एका तरुणाचा ब्रेन स्ट्रोकने मृत्यू झाला. अभिजित शशिकांत शिंदे (३८) असे मृताचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी चिंचवडमध्ये ही घटना घडली. अहवालानुसार, मृत तरुण वयातच हिंदुत्ववादी संघटनांकडून प्रभावित होता. २१ मार्च रोजी रात्री ९ वाजण्याच्या सुमारास, तो मित्रांसोबत चित्रपट पाहण्यासाठी गेला होता. चित्रपट पाहिल्यानंतर जवळपास तासभर मित्रांसोबत चर्चा केली. त्यानंतर तो कोणाशीही न बोलता थेट झोपी गेला. सकाळी अभिजीतचे वडील खोलीत गेले असता तो बेशुद्धावस्थेत असल्याचे पाहिले. (a man dies due to brain stroke after watching the film the kashmir files in pune)
यानंतर शेजाऱ्यांच्या मदतीने त्यांनी तात्काळ अभिजीतला खासगी रुग्णालयात नेले. अनेक दिवसांच्या उपचारानंतर रविवारी (२७ मार्च) रात्री अभिजीतचा मृत्यू झाला. अभिजीतला सकाळी ब्रेन स्ट्रोक आला आणि मेंदूला रक्त वाहून नेणारी रक्तवाहिनी फुटल्याने त्याचा मृत्यू झाला. असे सांगितले जात आहे की, अभिजीतला उच्च रक्तदाब असल्याने तो खूप संवेदनशील होता.
११ मार्च रोजी रिलीझ झालेल्या या चित्रपटाचे दिग्दर्शन विवेक रंजन अग्निहोत्री यांनी केले आहे. हा चित्रपट १९९० च्या दशकात काश्मीरमधील नरसंहार आणि काश्मिरी पंडितांच्या पलायनावर आधारित आहे. चित्रपटाच्या स्टारकास्टबद्दल बोलायचे झाले तर या चित्रपटात अनुपम खेर, मिथुन चक्रवर्ती, मृणाल कुलकर्णी, पल्लवी जोशी, दर्शन कुमार यांसारखे कलाकार दिसले आहेत. दुसरीकडे, जर आपण त्याच्या कलेक्शनबद्दल बोललो तर, या चित्रपटाने जगभरात २०० कोटींहून अधिक कमाई केली आहे.
दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
हेही वाचा