कलाकारांप्रती चाहत्यांचे प्रेम कोणत्या थराला पोहोचेल हे समजने फारच कठीण असते. चाहते आपल्या आवडत्या स्टारला भेटण्याासाठी नको त्या उचापती करत असतात, तर काहीजन त्यांच्या नावाचे टॅटू किंवा त्यांच्या सारखंत राहणीमान ठेवत असतात. काहीतर त्यांच्यासोबत फोटो काढून जवळ ठेवणं आणि आयुष्यभरासाठी ती आठवण जमा करु ठेवणं असं प्रत्येक चाहत्याचं स्पप्न असतं मात्र, बॉलिवूडचा खलनायक अर्थातच संजय दत्त याच्या सोबतही अशाच एका चाहतीचा किस्सा घडला आहे जो त्याच्या आयुष्यात कधी विसरणार नाही.
खलनायक म्हणून बॉलिवूडमध्ये राज्य करणारा लोकप्रिय अभिनेता संजय दत्त (Sanjay Dutt) याने आपल्या दमदार अभिनयाने चाहत्यांच्या मनावर अनेक वर्ष राज्य केलं आहे. त्याशिवाय संजयचा अभिनयातील प्रवासही सगळ्यांनाच माहित आहे. असं असूनही संजूसाठी चाहत्यांमध्ये वेगळीच क्रेज आहे. संजूचे अनेक चाहते आहेत मात्र, तो आयुष्यात कधीच एका चाहतीला विसरणार नाही अशी प्रतक्रिय एका मुलाखतीदरम्यान त्याने सांगितली. कारण? कारण तिनं केलेलं एक काम.
गोष्ट आहे 2018 ची, 62 वर्षीय निशा नावाची एक चाहती होती, तिच्या निधनानंतर संजय दत्तला पोलिसांकडून फोन आला होता जे एकून संजूच्या पायाखालची जमीन सरकली होती. पोलिसांनी सांगितेल की, निशा पाटील नावाच्या अनोळखी महिलेचं काही दिवसांपूर्वी निधन झालं हे सांगत त्यांच्या पश्चात त्यांची संपत्ती तुमच्या नावे केल्याची माहिती त्यांनी दिली.
View this post on Instagram
दिवंगत निशा यांनी बॅंक ऑफ बडोदा (Bank of baroda) ईमेलच्या (Email) माध्यमातून संपर्क साधत जिवंत असतानाच त्यांनी संपत्तीचा हक्क संजय दत्तकडे दिला होता. निशा त्यांच्या निधनापूर्वी 72 कोटी रुपयांची संपत्ती संजयच्या नावी केल्याची बाब त्यांच्या मृत्यू पत्रात नमूद केली होती. त्याशिवाय यामध्ये बॅंकेच्या लॉकरमध्ये ठेवलेल्या दागिन्यांचाही समावेश होता.
सांगायचे झाले तर, (दि, 15 जानेवारी 2018 ) साली वयानुसार प्रदिर्घ आजाराने त्यांचं निधन झालं. निशा एक गृहिनी होत्या, त्या 80 वर्षाच्या आई सोबत मलबार हिल मध्ये राहात होत्या. निशा यांच्या निधनाच्या दुसऱ्या दिवशी त्यांच्या मृत्युपत्राचं कुटुंबियांसमोर वाचन करण्यात आलं तेव्हा पूर्ण कुटुंबियांना त्यांच्या संपत्ती हक्कांविषयीची माहिती मिळाली. जेव्हा संजय दत्तला ही बातमी समजली तेव्हा त्याने अतिशय नम्रपणे निशा यांच्या संपत्तीचा संपूर्ण भाग त्यांच्या कुटुंबियांकडे परत देण्याचा निर्णय घेताल, एका चाहतीने अभिनेत्यासाठी उलेलं हे पाऊल संजय दत्तच्या मनात घर करुन गेलं. त्यामुळे तो आयुष्यात कधीच त्याच्या या फॅनला विसरु शकणार नाही हे मात्र नक्कीच.
हेही वाचा-दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
रितेश देशमुखलाही ‘पठाण’ चित्रपटाचं वेड; कौतुक करत म्हणला,’मी आधीच तिकीट बुक केलंय…’
‘काकू सारखी दिसते आता…’ ऐश्वर्या राय झाली ‘या’ कारणासाठी सोशल मीडियावर ट्रोल










