Wednesday, December 6, 2023

बॉलिवूडमधील दिग्गज अभिनेते असलेल्या संजय दत्त आणि नाना पाटेकर यांनी आजपर्यंत का केले नाही सोबत काम

बॉलिवूडमध्ये अनेक कलाकार आहेत ज्यांनी त्यांच्या करिअरमध्ये अनेक कलाकारांसोबत काम करण्याची संधी मिळते. कधी कधी तर काही कलाकार एकापेक्षा जास्त वेळा सोबत काम करताना दिसतात. मात्र असेही काही कलाकार आहेत, ज्यांनी त्यांच्या मोठ्या करिअरमध्ये काही लोकप्रिय अभिनेत्यांसोबत काम केले नाही. आज आम्ही तुम्हाला दोन अशाच कलाकारांबद्दल सांगणार आहोत.

संजय दत्त बॉलिवूडचा संजू बाबा. हिंदी सिनेसृष्टीतील टॉपचा अभिनेता म्हणून त्याची ओळख आहे. मुख्य अभिनेता, खलनायक, सहायक, कॉमेडी आदी सर्वच भूमिका साकारणाऱ्या संजयने त्याची एक वेगळी आणि मोठी ओळख निर्माण केली आहे. नुकतंच संजय दत्तची मुख्य खलनायकाची भूमिका असणारा केजीएफ 2 सिनेमा तुफान गाजत आहे. इंडस्ट्रीमध्ये 42 वर्ष पूर्ण करणाऱ्या संजय दत्तने त्याच्या एवढ्या वर्षांच्या कारकिर्दीत अनेक लहान मोठ्या कलाकारांसोबत काम केले. मात्र त्याने एकदाही नाना पाटेकर यांच्यासोबत काम केले नाही, आणि त्याला कधी त्यांच्यासोबत काम करायची इच्छा देखील नाही.

मुंबईमध्ये 1993 साली झालेल्या सिरीयल बॉम्ब ब्लास्टने संपूर्ण देशाला हादरून सोडले. या ब्लास्टमध्ये अनेक लोकांचा मृत्यू झाला होता. पोलिसांना संजय दत्तच्या घरी AK-56, हॅन्ड ग्रेनेड्स, काही बुलेट्स, मॅगझीन सापडल्याने त्याला अटक केली होती. त्यानंतर ही बातमी वाऱ्यासारखी संपूर्ण देशात पसरली. चौकशी दरम्यान संजय दत्तने ही हत्यार त्याच्या कुटुंबाच्या सुरक्षिततेसाठी ठेवल्याचे सांगितले होते.

या ब्लास्टमध्ये नाना पाटेकर यांनी त्यांच्या भावाला गमावले होते. त्याचमुळे ते संजय दत्तवर नाराज होते. एकदा नाना पाटेकर यांनी सांगितले की. “त्याने जो गुन्हा केला आहे तो भयावह आहे. त्यांच्यास्तही न्यायाची परिभाषा वेगळी का आहे? एका गरीब व्यक्तीसाठी कायदा वेगळा आणि माझ्यासाठी कायदा वेगळा. कारण काय तर मी एक अभिनेता आहे.” एवढेच नाही तर जेव्हा संजय दत्तची साज माफ झाली तेव्हा नाना पाटेकर यांनी अनेक प्रश्न उपस्थित केले होते. त्यानंतर नाना पाटेकर यांनी एका मुलाखतीमध्ये सांगितले की, “भलेही संजयची साज माफ झाली असो, मात्र ते त्याला कधीच माफ करणार आणि त्याच्यासोबत कधीच काम देखील करणार नाही.”

पुढे नाना पाटेकर यांनी सांगितले की, “जर त्यादिवशी माझ्या पत्नीने आधीची बस पकडली असती तर तिला देखील मी या घटनेत गमावून बसलो असतो.” नाना यांनी असेही सांगितले की, ते असे नाही म्हणत की बॉम्ब ब्लास्ट संजयने केले मात्र यात कुठे ना कुठे त्याचाही हात होता, म्हणूनच त्यांनी संजयला चित्रपटांसाठी बॉयकॉट केले. (know why nana patekar worked with sanjay dutt in films)

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

हेही वाचा-
लग्नानंतर देवोलिना विशाल सिंहसोबत दिसली रोमँटिक अंदाजात; युजर्स म्हणाले, ‘ये रिश्ता क्या कहलाता है…’

‘तिला पाहुन आजही येतात डोळ्यात अश्रू येतात’, नाना पाटेकरांनी सांगितली ‘या’ अभिनेत्रीसोबतची लवस्टोरी

हे देखील वाचा