बॉलिवूडचा अतिशय यशस्वी, लोकप्रिय, ऑस्कर पुरस्कार विजेता संगीतकार ए. आर. रहमान यांचा आज वाढदिवस. 6 जानेवारी 1966 साली चेन्नईमध्ये अल्लाह रख्खा रहमान उर्फ ए.आर.रहमान यांचा जन्म झाला. रहमान यांना संगीताचा वारसा त्यांच्या वडिलांकडून संगीतकार आर के शेखर यांच्याकडून मिळाला. रहमान 9 वर्षाचे असतांना त्यांच्या वडिलांचे निधन झाले. त्यामुळे त्यांच्या परिवारावर आर्थिक संकट ओढवले गेले. हे संकट इतके मोठे होते की रहमान यांना त्यांच्या घरातील संगीतवाद्य देखील विकावे लागले. त्यानंतर हळू हळू त्यांचा संघर्ष चालू होता. रहमान यांना 1992 साली आलेल्या ‘रोजा’ चित्रपटाने रहमान यांचे नशीब बदलले ते कायमचेच.
त्यानंतर रहमान यांनी अतिशय दमदार गाणी चित्रपटसृष्टीला दिली. रहमान यांचा आवाज आणि त्यांचे संगीत थेट ऐकणाऱ्याच्या हृदयापर्यंत पोहचते. रहमान यांचे फक्त भारतात नाही तर संपूर्ण जगात लाखो-करोडो फॅन्स आहेत. रहमान यांना अनेक देशी, विदेशी पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले. त्यांना अतिशय मानाच्या आणि जगातल्या सर्वात मोठ्या ऑस्कर पुरस्कानाने देखील गौरवले गेले आहे.
‘रंगीला’, ‘ताल’, ‘दिल से’, ‘जोधा अकबर’ ‘रंग दे बसंती’, ‘रॉकस्टार’, युवराज, स्लमडॉग मिलिनियर यांसारख्या अनेक चित्रपटांना त्यांनी संगीत दिले. यांसोबतच रहमान यांनी एंड्रयू लॉयड बेबर यांच्या ब्रोडवे म्यूजिकल ‘बाम्बे ड्रीम्स’ साठी पहिल्यांदा आंतरराष्ट्रीय पातळीवर संगीत दिले. ए.आर.रहमान यांनी 1997 साली भारताच्या 50 व्या स्वातंत्रदिनाच्या निमित्ताने ‘वंदे मातरम’ नावाचा एक अल्बम तयार केला. हा अल्बम प्रचंड लोकप्रिय झाला. त्यानंतर त्यांनी ‘जन गण मन’ नावाचा अल्बम तयार केला. भारताच्या राष्ट्रगीतावर आधारित या अल्बममध्ये भारतीय संगीतातील अनेक दिग्गज कलाकार होते.
आजच्या तरुणांसाठी संगीताचे विद्यापीठ असणारे ए.आर.रहमान हे जन्मतः हिंदू होते. त्यांचे खरे नाव अरुणाचलम् शेखर दिलीप कुमार मुदलियार असे होते. मात्र त्यांनी त्यांच्या जन्मानंतर काही काळाने धर्मांतर केले. त्यांच्या धर्मांतरासाठी एक घटना खूप महत्वाची ठरली ज्यामुळे त्यांनी धर्म बदलला. ती घटना म्हणजे रहमान यांची बहीण खूप आजारी होती. डॉक्टरांचे प्रयत्न देखील असफल झाले होते, तेव्हा रहमान यांनी सर्व प्रार्थनास्थळांवर जाऊन बहिणीच्या उपचारासाठी प्रयत्न केले. १९८४ साली त्यांची भेट कादरी तारिक यांच्याशी झाली आणि त्यानंतर रहमान यांच्या बहिणाला बरं वाटू लागले. कादरी यांच्या भेटीचा रेहमान यांच्यावर खूप खोल परिणाम झाला आणि त्यांनी धर्मपरिवर्तन करत इस्लाम धर्म स्वीकार केला. त्यानंतर त्यांनी त्यांचे नाव ए.आर. रहमान असे ठेवले.
रहमान यांना आतापर्यंत चार नॅशनल पुरस्कार, दोन अकॅडमी पुरस्कार, दोन ग्रॅमी पुरस्कार, एक बाफ्टा अवॉर्ड, एक गोल्डन ग्लोब अवॉर्ड, 15 फिल्मफेयर अवॉर्ड आणि 16 साऊथ फिल्मफेयर अवॉर्ड मिळाले आहेत. अशा संगीत दिग्गजाला दैनिक बोंबाबोंबकडून वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.(a r rahman birthday special story the composer chose sufism religion and changed his name)
दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
सुशांत सिंग आत्म’हत्ये प्रकरणी हनी सिंगच माेठं वक्तव्य; म्हणाला, ‘अभिनेत्याचा मृत्यू…’
‘दाखवणे बंद करा लोक बोलणे बंद करतील’, उर्फी जावेद व चित्रा वाघ यांच्या वादावर सुप्रिया सुळे यांचे मत