Saturday, April 20, 2024

एआर रहमानच्या शिरपेचात मानाचा तुरा! मलेशियात झाला मोठा गौरव, जाणून तुम्हालाही वाटेल अभिमान

दिग्गज लोकप्रिय संगीतकार आणि गायक एआर रहमान याने हिंदी भाषेतच नाही, तर अनेक भाषामध्ये आपल्या मधुर संगीताने लोकांचे मनोरंजन केले आहे. आज त्याला कोणत्याही ओळखीची गरज नाही. संगीत क्षेत्रामध्ये त्याने अमाप योगदान देत नवीन रेकॉर्ड बनवले आहेत. एआर रहमानला त्याच्या योगदानाला भारत सरकारने अनेक पुरस्कार देऊन सन्मानित केले आहे. यासोबतच आपल्या कौशल्याने आणखी एक यश गाठले आहे. चला तर जाणून घेऊया पूर्ण माहिती.

हिंदी चित्रपटाचे लोकप्रिय संगीतकार आणि गायक एआर रहमान (AR Rahman) याने यशाचे आणखी एक शिखर पार केले आहे. मलेशियामध्ये नुकत्याच पार पडलेल्या कार्यक्रमामध्ये आणखी एक यश गाठले आहे. त्याचा मलेशियामध्ये संगीताचा एक कार्यक्रम होता, तेव्हा कार्यक्रमाच्या आयोगाने ‘मलेशिया रेकॉर्ड बुक’मध्ये एआर रहमानचे नाव नोंदवले आहे.

मलेशिया कार्यक्रमामध्ये झाले असे की, मलेशिया कार्यक्रमाच्या आयोजकाने कार्यक्रमाची घोषणा करण्यासाठी एक वेगळीच तिकडम लावली होती. ते पाहून सगळेजण हैराण झाले होते. गायकाच्या आयोजकाने केले असे की, डीएमवाय कार्यक्रमाचे निर्माते अध्यक्ष दातो मोहम्मद युसुफ (Dato Mohommad Yusof) याने मलेशियामध्ये एआर रहमानच्या संगीत कार्यक्रमाची घोषणा करण्यासाठी 10 हजार फुटापेक्षाही जास्त उंचावर हेलीकॉप्टर नेऊन उडी मारली. या हेलीकॉप्टरमध्ये त्यांच्यासोबत त्यांचे सहाय्यकही होते. घोषणा करत असताना त्यांनी पॅराशूटही घातले होते.

हे सगळे दृश्य कॅमेरामध्ये रेकॉर्ड केले असून एआर रहमानने हा खास क्षण आपल्या सोशल मीडियावर चाहत्यांसोबत शेअर केला आहे. त्याने अध्यक्ष आणि त्यांचे सहयोगी झेंडा घेऊन उडी मारतानाचा व्हिडिओ आपल्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवर शेअर केला आहे. हा व्हिडिओ शेअर करत असताना रहमानने कॅप्शनमध्ये लिहिले होते की, “मलेशिया, तुम्ही तयार आहात का?” हा कार्यक्रम मलेशियामध्ये स्थित क्वालालंपूरस्थित नॅशनल जलिल स्टेडियममध्ये होणाऱ्या कॉन्सर्टला एआर रहमाने ‘सीक्रेट ऑफ सक्सेस’, असे नाव दिले आहे.

युसुफ फर्म डीएमवाई क्रिएशन यांनी सात वर्षाच्या कालावधीनंतर मलेशियामध्ये मोजार्ट ऑफ मद्रासच्या विशाल संगीताचा कार्यक्रम आयोजित करत आहेत. हा कार्यक्रम पुढच्या वर्षी 28 जानेवारीला आयोजित करणार आहेत. एआर रहमानला गेल्या महिन्यातच आणखी एक यश प्राप्त झाले होते. एआर रहमानचा सत्कार करण्यासाठी कॅनडा शहराच्या ‘मरखम’ रस्त्याचे नाव बदलून एआर रहमान ठेवले आहे. याच्या आगोदर 2013 मध्ये मरखम ( कॅनडा) या दुसऱ्या रस्त्याला संगीतकार एआर रहमान याच्या नावावर ‘अल्लाह-रखा रहमान सेंट’, असे नाव दिले होते.

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
युजरने ‘बबिता’ला विचारली, एका रात्रीची किंमत किती? ‘का रे भ***व्या’ म्हणत अभिनेत्रीनेही शिकवला धडा
बाबो! दीपिका आहे बॉलिवूडमधील सर्वात श्रीमंत अभिनेत्री, तिच्याइतकी संपत्ती कुठल्याच ऍक्ट्रेसकडे नाही
कलाविश्वावर शोककळा! प्रसिद्ध अभिनेत्रीचे निधन, दोन दिवसापूर्वीच केला होता 50वा बड्डे साजरा

हे देखील वाचा