सध्या केंद्रिय गृहमंत्री अमित शहा यांच्या राजभाषा समितीच्या बैठकीत हिंदी भाषेविरुद्ध केलेल्या वक्तव्याने चांगलाच वाद निर्माण झाला आहे. त्यांच्या या वक्तव्यावर अनेकांनी नाराजी व्यक्त केली आहे. तर काही जणांनी त्यांच्या या वक्तव्याचे समर्थनही केले आहे. आता या भाषावादात प्रसिद्ध गायक ए. आर रहमानने उडी घातली आहे. त्यांच्या या वक्तव्याविरोधात ए. आर रहमानने (A.R.Rahman) एक फोटो पोस्ट केला आहे. ज्यामुळे आता ए. आर रहमानवर नेटकऱ्यांनी जोरदार टीका केली आहे.
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी गुरुवारी संसदीय राजभाषा समितीच्या ३७व्या बैठकीचे अध्यक्षस्थान करताना सांगितले की, स्थानिक भाषांऐवजी हिंदीकडे इंग्रजीचा पर्याय म्हणून पाहिले पाहिजे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सरकार चालवण्याचे माध्यम राजभाषा असल्याचा निर्णय घेतल्याने हिंदीचे महत्त्व नक्कीच वाढेल, असे ते म्हणाले होते. गृहमंत्र्यांच्या या वक्तव्यानंतर तामिळनाडूचे माजी मुख्यमंत्री आणि कर्नाटकच्या माजी मुख्यमंत्र्यांनी या वक्तव्याला विरोध केला होता. आता या वादात ए. आर. रहमानने उडी घेतली आहे.
याबाबत ए. आर रहमानने हिंदी भाषेबाबत एक पोस्ट केली, जी खूप व्हायरल होत आहे. रहमानने तमिळ देवी ‘तमिझांगू’चे पोस्टर सोशल मीडियावर शेअर केले आहे. या पोस्टरमध्ये क्रांतिकारी कवी भारतीदासन यांच्या कवितेतील ओळी लिहिल्या आहेत. ओळींमध्ये ‘इनबा थामीज कोण उरीमाई सेम्पैरुक्कु वेर’ असे लिहिले आहे. या ओळींचा अर्थ तामिळ हा आपल्या हक्काचे मुख्य मूळ आहे. रहमानने ट्विटर आणि इंस्टाग्रामवर ही पोस्ट शेअर केली आहे.
— A.R.Rahman (@arrahman) April 8, 2022
अमित शहांच्या वक्तव्यानंतर हिंदीविरोधी मोहीमही सुरू झाली आहे. एआर रहमानची पोस्ट शेअर केल्यानंतर चित्रपट जगतातील लोक आणि रहमानचे चाहते त्यावर प्रतिक्रिया देत आहेत. अनेक लोक त्याला सपोर्ट करत आहेत, तर काही लोकांनी एआर रहमानला ट्रोलही केले आहे. याबद्दल चित्रपट दिग्दर्शक मणिरत्नम म्हणाले, “मला तो माणूस म्हणून खूप आवडतो. तो सुज्ञ आहे आणि तो आमच्यासोबत आहे यामुळे आम्ही भाग्यवान आहोत.” तर आणखी एकाने
“आम्हाला दक्षिण भारतीय लोकांशी कोणतीही अडचण नाही, परंतु एआर रहमानसारखे सेलिब्रिटी लक्ष वेधण्यासाठी वर्णभेदासारखी विधाने करतात.” असे म्हणत त्याच्यावर टीका केली आहे.
दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
हेही वाचा-