स्टार प्रवाहवरील ‘आई कुठे काय करते’ या मालिकेत ‘अनघा’ची भूमिका साकारणारी अभिनेत्री अश्विनी महांगडे सतत वेगवेगळ्या कारणांमुळे चर्चेत असते. इतर गोष्टींपेक्षा समाजसेवा करण्यासाठी ती अधिक ओळखली जाते. यामुळे अभिनेत्रीचे बऱ्याच वेळा कौतुकही केले जाते. इतरांना मदत करता यावी, यासाठी अश्विनीने जवळपास २ वर्षांपूर्वी ‘रयतेचे स्वराज्य प्रतिष्ठान’ची स्थापना केली होती. या योजनेच्या मार्फत तिने अनेक गरजूंना मदत केली आहे. आताही कोरोना काळात ती अनेकांना मदत करताना दिसत आहे.
आता अश्विनीने रयतेचे स्वराज्य प्रतिष्ठानमार्फत, गरजूंना मोफत जेवण देण्याचा निर्णय घेतला आहे. म्हणजेच, रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांना विनामूल्य जेवण उपलब्ध करून दिले जाईल. विशेष म्हणजे ही योजना केवळ एकाच ठिकाणी नव्हे, तर महाराष्ट्रातील वेगवेगळ्या ठिकाणी राबवली जाईल.
सासवड, बारामती, सातारा, फलटण, शिरवळ, खंडाळा, कल्याण शहर, टिटवाळा शहर, ठाणे, अंधेरी, अष्टा शहर, हिंडलगा बेळगाव, इस्लामपूर, नेरुळ, घाटकोपर अशा विविध भागातील गरजूंना या योजनेचा लाभ मिळेल. अश्विनीने यासंबंधीत एक पोस्ट इंस्टाग्रामवर शेअर केली आहे, ज्यात याबद्दल संपूर्ण माहिती देण्यात आली आहे.
आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवर ही पोस्ट शेअर करत, अभिनेत्री इतरांनाही मदत करण्याचे आवाहन केले आहे. पोस्टच्या कॅप्शनमध्ये तिने लिहिले, “कोरोनाच्या या महासंकटात बाहेर सर्वच गोष्टींची टंचाई निर्माण झाली आहे. या कठीण काळात आपल्या लोकांना आपली गरज आहे. आपण प्रत्येकजण या समाजाचे काहीतरी लागतो या भावनेतून जमेल तशी मदत करा. नक्कीच पुण्य मिळेल. आम्हीही शक्य ती आणि शक्य त्या ठिकाणी आमचं कर्तव्य पार पाडत आहोत. तुम्हीही यात सामील व्हा.” ही कामगिरी करून अश्विनीने पुन्हा एकदा लाखो मने जिंकली आहेत.
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-कोरोनामधून बरी झाल्यानंतर पाहा काय म्हणतेय ‘शालू’, फेसबुकवर शेअर केली खास पोस्ट!