मराठी मालिका सध्या तुफान गाजताना दिसत आहे. त्या मालिकांची लोकप्रियता पाहून त्यांचे विविध भाषांमध्ये रिमेक देखील होत आहे. काही मालिकांनी तर प्रेक्षकांच्या मनावर राज्य केले, किंबहुना करत आहे. सध्याच्या घडीला मराठी मनोरंजनविश्वात गाजणारी लोकप्रिय मालिका ‘आई कुठे काय करते.’ या मालिकेने तर लोकप्रियतेचे शिखर गाठत लोकांच्या मनाचा ठाव घेतला. या मालिकेने तर प्रसिद्ध मिळवली सोबतच मालिकेत मुख्य भूमिका साकारणाऱ्या अरुंधती अर्थात मधुराणी प्रभुलकरला देखील लोकांचे अमाप प्रेम मिळत आहे.
मधुराणी सोशल मीडियावर देखील कमालीची सक्रिय असून ती सतत तिच्या नवनवीन पोस्टद्वारे चाहत्यांना तिच्याबद्दल अपडेट देत त्यांच्या संपर्कात राहते. मधुराणी अनेक मनातल्या भावना देखील मोकळेपणाने मांडत असते. तिच्या पोस्ट देखील सोशल मीडियावर तुफान गाजत असतात. या पोस्टमुळे तिला मोठ्या प्रमाणावर लाईमलाइट मिळते. सध्या मधुराणीच्या एक पोस्ट खूपच चर्चेत आली आहे. ‘साहस आणि धाडस’ या दोन शब्दांना अतिशय उत्तम पद्धतीने तिने मांडले आहे.
मधुराणीने तिच्या पोस्टमध्ये लिहिले, “साहस ….धाडस…हे शब्द एका वयानंतर अनेकांच्या आयुष्यात केवळ काही निर्णयांपुरते सीमित राहतात… अशा अनुभवांना सामोरं जाण आपण सोडून देतो… त्यातला थरार अनुभवणं सोडून देतो… स्वतः ला चौकटीत अडकवून घेतो. खरेखुरे धाडसी खेळ खेळून मलाही काळ लोटला होता…केवळ मुलीला साथ द्यायची म्हणून मी करायचं ठरवलं… ‘मुलांचंच आहे …. सोप्पं असेल आपण अस्स करू’ ह्या भ्रमात मी होते. एकेक challenging पायऱ्या पार करत करत तो टॉवर वरपर्यंत आम्हाला चढायचा होता. एखाद्या पायरीवर दोरीला बांधलेले , हवेत तरंगणारे लाकडाचे ब्लॉक्स होते … एका पायरीवर लटकणारे टायर्स होते … कुठे लाकडी लटकणारे बोगदे होते ज्यातून रांगत जायचं होतं… एकंदरीत ह्यातलं मी कधीच काही केलं नव्हतं. माझे पाहिल्याच पायरीवर त्राण गेले…. अशक्य वाटायला लागलं….मी मागे फिरायचं ठरवत होते ..मी घाबरले तशी स्वरालीपण मागे फिरायला लागली , मला हे असं व्हायला नको होतं … मी तिच्यासाठी करत होते, मी घाबरले तर ती हे कधीच करणार नाही ….होतं न्हवतं ते सगळं धैर्य एकवटून मी ती पहिली स्टेप पार केली तशी मला बघून स्वरालीनी पण पार केली ….पुढचं करायचा धीर आला…. तरी प्रत्येक वळणावर’ हे आपल्याला नाहीच जमणार ‘ असं वाटतच होतं… तरी आमचा trainer मनोहर खूपच बळ देत होता… एकेक करत पुढे पुढे जात राहिलो आता मागे वळण्याचा स्कोप नव्हता समोर येईल ते पार करणं भागच होतं…आम्ही दोघी जेव्हा वर पोहचलो तेव्हा मला अक्षरशः रडायला येत होतं….आपल्या आतलं , आपल्यालाच मागे खेचणारं काहीतरी आपण पार केलं अश्या जणीवेनी थरथरायला होत होतं…करून बघितल्याशिवाय कळतच नाही नं आपण काय करू शकतो.
मराठीमध्ये अनेक मधुराणीने अनेक उत्तम मालिकांमध्ये आणि चित्रपटांमध्ये काम केले. मात्र आई कुठे काय करते या मालिकेने तिला यशाच्या शिखरावर नेऊन ठेवले. खऱ्या अर्थाने ही मालिका तिच्यासाठी तिच्या करिअरसाठी टर्निंग पॉईंट ठरली.
दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
हेही वाचा-