×

Viral | रेल्वे स्टेशनवर गोविंदाच्या गाण्यावर ‘अशी’ थिरकली महिला, डान्स पाहण्यासाठी लोकांनी चुकवल्या ट्रेन

सध्याचे युग हे सोशल मीडियाचे युग म्हणून ओळखले जाते. इंटरनेटच्या जगतात रोज नवनवे लोक व्हायरल होत असतात. अनेकदा एखाद्याचा भन्नाट डान्स लोकांना आवडतो, तर एखाद्याचा आवाज मनात भरत असतो. सोशल मीडियावरील अशा व्हायरल व्हिडिओंमुळे अनेकजण रातोरात स्टारही झालेले आपण पाहिले आहेत. सध्या सोशल मीडियावर सर्वत्र व्हायरल होत आहे, ज्यामध्ये एका महिलेचा रेल्वे स्टेशनवर डान्स करताना दिसत आहे.

सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ जोरदार व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये एक महिला साडी नेसून डोक्यावर पदर धरून रेल्वे स्टेशनवर गोविंदाच्या ‘आपके आ जाने से’ गाण्यावर नाचताना दिसत आहे. ही महिला गाण्याच्या तालावर अशाप्रकारे नाचते की, तिच्या मागे उभे असलेले लोक तिच्यापासून नजर हटवू शकत नाहीत. व्हिडिओच्या या छोट्या क्लिपमध्येही महिलेचा डान्स इतका अप्रतिम आहे की, तिच्या मागे उभे असलेले लोक तिच्या पावलावर पाऊल टाकून स्वत:च नाचू लागतात. या महिलेचा डान्स पाहता पाहता काही लोकांची ट्रेन चुकल्याचेही सांगण्यात आले आहे. म्हणजेच एकंदरीतच लोकांना महिलेची ही स्टाईल खूप आवडली आहे.

View this post on Instagram

A post shared by Nitu Mehna (@mehnanitu)

हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर महिलेच्या या मस्त स्टाइलला नेटकऱ्यांची पसंती मिळत आहे. मेहनानिटू या हँडलवरून हा व्हिडिओ इन्स्टाग्रामवर शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये, “मागे वळून पाहा, दोघेही माझी कॉपी करत आहेत” असे लिहले आहे. यावर लोकांनी खूप मजेशीर कमेंट्सही दिल्या आहेत. अनेकांनी “हे कोणते स्टेशन आहे?” असाही प्रश्न विचारला आहे. तर एका युजरने यावरून हे सिद्ध होते की जर कौशल्य असेल तर पेहरावाने फरक पडत नाही. अशी प्रतिक्रिया देत महिलेचे कौतुक केले आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा-

Latest Post