Friday, July 5, 2024

‘महाराष्ट्रामध्ये मराठी चित्रपटांपेक्षा…’ मिलिंद गवळींच्या ‘त्या’ पोस्टने वेधले सर्वांचे लक्ष

मराठीमधील अतिशय प्रभावी आणि विचारू अभिनेते अशी ओळख असलेले मिलिंद गवळी नेहमीच सोशल मीडियावर वेगवगेळ्या पोस्ट शेअर करताना दिसतात. मिलिंद गवळी हे त्यांचे विविध अनुभव पोस्टच्या माध्यमातून मांडत त्यांच्या फॅन्सशी संपर्कात असतात. सध्या मराठी मालिकाविश्वातील आघाडीची मालिका असलेल्या ‘आई कुठे काय करते?’मध्ये अनिरुद्ध ही भूमिका उत्तम पद्धतीने वठवणाऱ्या मिलिंद यांची दमदार फॅन फॉलोविंग आहे. मालिकेत जरी ते नकारात्मक भूमिकेत असले तरी प्रत्यक्ष आयुष्यात मात्र ते अतिशय सकारत्मक आहे. नुकतीच त्यांनी त्यांच्या इंस्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. ज्यात त्यांनी त्यांच्या आयुष्यात आलेल्या एका अनुभवावर लिहिले आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Milind Gawali (@milindgawali)

मिलिंद गवळी आणि डबल रोल असलेला एक सिनेमा साइन केला होता. मात्र पुढे त्या सिनेमाचे काय झाले? तो पूर्ण झाला का? आदी अनेक गोष्टींबद्दल त्यांनी माहिती दिली आहे. मिलिंद यांनी त्यांच्या पोस्टमध्ये लिहिले, “तेजस्विनी”
माझा डबल रोल, चित्रपट 90% पूर्ण,
चित्रपटात महत्त्वाची व्यक्तिरेखा साकारणारे अतिशय गोड व्यक्तिमत्व म्हणजे आनंद अभ्यंकर,
मुंबई पुणे हायवे अपघातात गेले,
निर्माते मस्के त्यांचं राहतं घर गहाण ठेवलं होतं हा चित्रपट करण्यासाठी,
या चित्रपट शर्वरी जमिनीस , डॉक्टर विलास उजवणे असे कलाकार आहेत,
दिग्दर्शक सतीशराव रणदिवे यांच्याबरोबरचा माझा पाचवा का सहावा चित्रपट होता, आम्ही सगळ्यांनी खूप प्रयत्न केला हा चित्रपट पूर्ण करून तो प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचा पण काही गोष्टी आपल्या हातातच नसतात, प्रत्येक चित्रपटाचं आपलं नशीब असतं,
मराठी चित्रपट करणे हे एका निर्मात्यासाठी फार सोपी गोष्ट नाहीये, खूप कठीण परिस्थितीत तो चित्रपट तयार होत असतो,
त्याच्या नशिबाने जर पूर्ण झालाच तर आपल्याकडे डिस्ट्रीब्युटर्स त्याला हात लावत नाहीत, ज्या पद्धतीने इंग्रजी हिंदी दक्षिणात चित्रपटांना जसा रिस्पॉन्स देतात तसा मराठी चित्रपटांना मिळत नाही , producer ला स्वतः रिलीज करावा लागतो किंवा मग एखादा रिलीजिंग पार्टनर घ्यावा लागतो जो,
जो प्रोड्युसरला LIFO ( last In First Out ) सिस्टीम ने फसवतो, आपल्या महाराष्ट्रामध्ये मराठी चित्रपटांपेक्षा भोजपुरी नेपाळी चित्रपट जास्ती पैसा कमावतात, south च चित्रपट तर पैसा कमावतातच कमवतात, latest Pushpa Telugu, KGF & Kantara Kannada, फॉरेन फिल्म तर आहेतच महाराष्ट्रात थेटर मधनं खोर में खोर्याने पैसा कमवायला,
महाराष्ट्र मराठी माणसांचा आहे
पण महाराष्ट्र मराठी सिनेमांचा नाही.
हे कटू सत्य आहे.
Statistics काढले Research केला
तर किती मराठी प्रोड्युसर survive झाले आहेत,
जगले आहेत किंवा जिवंत राहिले आहेत, (पैसे कमवणे तर लांबच राहिलं.)
हा खरा आकडा जर लोकांसमोर आला , तर धक्का बसेल,
आणि मराठी चित्रपट चांगले नसतात किंवा वाईट असतात असं नाहीये, अतिशय सुंदर विषय सादरीकरण आणि उत्तम अभिनय , असलेले असंख्य चित्रपट येऊन गेले,
मराठी प्रोडूसर मात्र जगला नाही,
” तेजस्विनी “चित्रपटाचे आमचे प्रोड्युसर मस्के यांचं राहतं घर जे गहाण होतं , ते कालांतराने कन्स्ट्रक्शनच्या धंद्यातून सोडून घेण्यात त्यांना यश मिळालं, त्या घरामध्ये तेजस्विनी चित्रपटाचे नऊ अतिशय उत्कृष्ट गाणी आणि 90% पूर्ण झालेला चित्रपट , कुठल्यातरी कोपऱ्यात पडला असेल.”

यावरून आपल्याला लक्षात येईल की, मराठी चित्रपटांची, मराठी चित्रपटांची निर्मिती करणाऱ्या निर्मात्यांची, दिग्दर्शकांची परिस्थिती किती भीषण होती. आज जरी ही परिस्थिती काही अंशी बदलली असली तरी त्यांना हिंदी चित्रपटांच्या निर्मात्या, दिग्दर्शकांइतके सुगीचे दिवस आलेले नाही. तत्पूर्वी मिलिंद गवळी यांनी मराठीमध्ये अनेक चित्रपटांमध्ये काम केले असून, त्यानी अनेक मालिका देखील केल्या आहेत.

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
हेमा मालिनीला धर्मेंद्रच्या पहिल्या पत्नीचा वाटताे हेवा? सिमी ग्रेवालच्या शोमध्ये अभिनेत्रीने केला खुलासा

राखी सावंतचा प्रेग्नेंसी अन् मिसकॅरेजवर धक्कादायक खुलासा; म्हणाली, ‘ऑपरेशननंतर आदिलने माझ्यासोबत…’

हे देखील वाचा