Friday, June 14, 2024

राखी सावंतचा प्रेग्नेंसी अन् मिसकॅरेजवर धक्कादायक खुलासा; म्हणाली, ‘ऑपरेशननंतर आदिलने माझ्यासोबत…’

आजकाल राखी सावंत तिच्या व्यवसायिक आयुष्याकडे दुर्लक्ष करुन आदिल खान दुर्राणीला शिक्षा व्हावी यासाठी जोरदार प्रयत्न करत आहे. तिने आदिलवर केवळ फसवणुकीचे आरोपच केले नाही, तर मारहाण केल्याचा दावाही केला आहे. राखीने आदिलचे तनु चंदेलसोबतच्या एक्स्ट्रामॅरिटल अफेयरचाही खुलासा केला होता. अशात आता राखी तिच्या मिसकॅरेजची वेदना आणि त्यानंतर काय झाले हे सांगून रडताना दिसली, ज्याचा व्हिडिओ साेशल मीडियावर माेठ्या प्रमाणात व्हायरल हाेत आहे. काय आहे नेमके प्रकरण? चला जाणून घेऊया…

तुम्हाला आठवत असेल, राखी सावंतने (Rakhi Sawant) जानेवारी 2023 मध्ये दावा केला होता की, ती बिग बॉस मराठीमध्ये असताना  प्रेग्नंट होती, पण यावर कोणाचाही विश्वास बसला नाही. एवढी गंभीर बाब सगळ्यांनी चेष्टेमध्ये टाळली. यानंतर जेव्हा तिने मिसकॅरेजचा उल्लेख केला, तेव्हा तिने आपले मूल गमावले. तर आदिल खान म्हणाला की, ‘हे सर्व फेक न्यूज आहे. त्यावर विश्वास ठेऊ नका.’,पण आता राखी पुन्हा एकदा तीच वेदना पुढे घेऊन आली आहे.

माध्यमाना दिलेल्या मुलाखतीत राखीने सांगितले की, “ऑपरेशन खूप मोठे हाेते. बिग बॉसमधून बाहेर आल्यानंतर माझे मिसकॅरेज झाले. आदिलने कुणाला सांगण्यास मनाई केली होती. ऑपरेशननंतर तीन महिने तुम्ही काहीही करू शकत नाही, असे डॉ.शिंदे यांनी आदिलला सांगितले होते. मात्र, तो 10 दिवसही थांबू शकला नाही. मी सांगायला पाहिजे नाही, पण आमच्यात ते सगळे घडले.”

 

View this post on Instagram

 

A post shared by Instant Bollywood (@instantbollywood)

राखी सावंत इथे त्या ऑपरेशनबद्दल बोलत आहे, जे सप्टेंबर 2022 मध्ये झाले होते. गर्भाशयाच्या वरच्या गाठीची शस्त्रक्रिया झाली हाेती, ज्यानंतर ती प्रेग्नेंट ही राहिली. लग्नाचा खुलासा झाल्यानंतर राखी सावंतने 5 फेब्रुवारी 2023 रोजी आदिलविरोधात गुन्हाही दाखल केला होता, ज्यानंतर 7 फेब्रुवारीला त्याला अटक करण्यात आली होती. यानंतर आदिलला न्यायालयात हजर केले असता तेथून 20 फेब्रुवारीपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. मात्र, राखी या निर्णयावर खूश नव्हती. कारण, तिला पोलिस कोठडी हवी होती पण तसे झाले नाही. चौकशी होऊ नये आणि प्रकरण उघडपणे समोर येऊ नये म्हणून आदिलच्या वकिलाने चतुराईने न्यायालयीन कोठडी घेतली.(dramaqueen rakhi sawant had miscarriage because of adil khan durrani shocking truth revealed)

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
चित्रपटसृष्टीला बहारदार संगीत देणारे ‘मोहम्मद खय्याम’, त्यांच्या जबरदस्त संगीताने केली प्रेक्षकांवर जादू

आधीच अफेअरच्या चर्चा, त्यात सोशल मीडियावर पोस्ट करत ‘अनन्याने’ माजवली खळबळ; एकदा वाचाच

हे देखील वाचा