Tuesday, July 9, 2024

गणपती विसर्जनापूर्वी आमिर अलीने केला रेमो डिसूझासह ‘असा’ डान्स; पाहून तुम्हीही व्हाल लोटपोट

सध्या सर्वांच्याच घरी गणपती बाप्पाचे आगमन झाले आहे. प्रत्येकाच्या घरी गणरायाचे जल्लोषात स्वागत झाले आहे. सर्व सामान्यांपासून ते सेलिब्रिटीपर्यंत सर्वच गणरायाच्या भक्तीमध्ये तल्लीन झाले आहेत. काही सेलिब्रिटी आपल्या घरी जल्लोष साजरा करताना दिसत आहेत. बाप्पासाठी सुंदर अशी सजावट केली आहे. बाप्पाची आरती या सर्व गोष्टी सर्वजण अगदी मनोभावे करतात. याच दरम्यान कोरियोग्राफर रेमो डिसूझा आणि आमिर अली यांनी प्रभु देवाच्या ‘उर्वशी’ या गाण्यावर बाप्पासमोर डान्स केला. आमिर अलीने विसर्जनापूर्वीच्या सेलिब्रेशनचा एक व्हिडिओ शेअर केला आहे.

यावेळी संपूर्ण बॉलिवूड आणि टीव्ही इंडस्ट्री गणपती उत्सवात बुडालेली दिसत आहे. अनेक कलाकार दीड दिवसांच्या पूजेनंतर बाप्पाचे विसर्जन करतात. साधारणपणे प्रत्येकजण गणपतीसमोर ढोल- ताशांवर नाचताना दिसतो, पण रेमो डिसूझा आणि आमिर अली यांनी बाप्पासमोर प्रभु देवाच्या ‘उर्वशी’ या गाण्यावर डान्स केला आहे.

हा मजेदार व्हिडिओ आमिर अलीने आपल्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला आहे. त्याचबरोबर कॅप्शन लिहिले की, “विसर्जनापूर्वीचा उत्सव असा असावा.” या व्हिडिओमध्ये दोघे ‘हमसे है मुकाबला’मधील ‘उर्वशी’ गाण्यावर नाचताना दिसत आहेत. यानंतर दोघेही बाप्पासमोर या गाण्यावर मजेदार शैलीत नाचताना दिसत आहेत.

दोघांच्या या व्हिडिओवर यांचे इंडस्ट्रीचे मित्र खूप मजा घेत आहेत. २०२०च्या सुरुवातीला आमिर आणि संजीदा सरोगसीने पालक झाले. आमिर अली आणि संजीदा शेख यांनी २०१२ मध्ये एकमेकांशी लग्न केले. लग्न करण्यापूर्वी आमिर आणि संजीदा यांनी एकमेकांना ७ वर्षे डेट केले. २०१९ मध्ये, जेव्हा दोघांनी काही कारणास्तव विभक्त होण्याचा निर्णय घेतला, तेव्हा त्यांच्या चाहत्यांना धक्का बसला होता.

रेमो डिसूझाला गेल्या वर्षी हृदयविकाराचा झटका आला होता. त्यानंतर त्याची पत्नी त्याला तातडीने रुग्णालयात घेऊन गेली. जेव्हा रेमोने छातीत दुखत असल्याची तक्रार केली, तेव्हा तो जिममध्ये होता. मात्र, काही दिवसांच्या उपचारानंतर त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला होता.

दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-ट्रोलर्सवर गरजली अर्शी खान, गणरायाच्या पूजेचे ‘हे’ फोटो केले होते पोस्ट

-‘बिग बॉस’च्या ‘या’ स्पर्धकांनी दिलाय जगाला निरोप; कोणी केली आत्महत्या, तर कोणाला आला हार्ट अटॅक

-कंगना नव्हे, तर ऐश्वर्याला ‘थलायवी’मध्ये पाहू इच्छित होत्या जयललिता; सिमी गरेवालने केला खुलासा

हे देखील वाचा