Monday, July 1, 2024

घटस्फोटानंतर आमिर अन् किरण मुलासोबत झाले एअरपोर्टबाहेर स्पॉट; व्हिडिओ व्हायरल

या ग्लॅमर जगात नाती पाहिली, तर हुशार माणूससुद्धा चक्रावून जाईल, इतके गुंतलेले नाते आपल्याला या क्षेत्रात पाहायला मिळतात. बॉलिवूडचा मिस्टर पर्फेक्शनिस्ट खान म्हणून ओळखला जाणारा आमिर खान सध्या त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे खूपच चर्चेत आला आहे. नेहमी त्याच्या चित्रपटांमुळे, त्याच्या सिनेमांच्या कमाईमुळे चर्चेत असणारा आमिर मागच्या महिन्यापासून त्याच्या वैवाहिक आयुष्यामुळे गाजत आहे.

मागच्या महिन्यात आमिर खानने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत त्याच्या आणि किरण रावच्या घटस्फोटाबद्दल माहिती दिली आणि इंडस्ट्री आणि फॅन्समध्ये एकच खळबळ उडाली. त्याने त्याच्या पोस्टमध्ये लिहिले होते की, आम्ही नवरा बायको म्हणून आता यापुढे नसलो, तरी मैत्री आणि कामाच्या बाबतीत नेहमी सोबत असू. किरण आणि आमिर दोघेही ‘लाल सिंग चड्ढा’ सिनेमात काम करत आहेत. (aamir khan and kiran rao are seen together even after divorce)

मागील अनेक दिवसांपासून काश्मीरमध्ये ‘लाल सिंग चड्ढा’चे शूटिंग सुरू होते. ते शूटिंग संपवून नुकतेच आमिर आणि किरण मुंबईत परत आले आहेत. मुंबईत आल्यानंतर त्यांना विमानतळाबाहेर स्पॉट करण्यात आले. आमिर आणि किरणसोबत त्यांचा मुलगा आझाद देखील होता.

आमिरसोबत किरणला पाहून सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला. घटस्फोटानंतर आताच नाही, तर याआधी देखील त्यांना सोबत पाहिले गेले आहे. अनेकांना या जोडीला सोबत पाहून त्यांच्या मैत्रीबद्दल आनंद होत आहे, तर काहींनी त्यांना प्रश्न विचारले आहे की, हा असा कसा घटस्फोट आहे? त्यांच्या या व्हायरल होणाऱ्या व्हिडिओमध्ये तिघेही एक आनंदी कुटूंब दिसते आहे. त्यांनासोबत पाहून अनेकांनी ते मुलासाठीसोबत दिसत असल्याने त्यांचे कौतुक देखील केले आहे.

आमिरचा आगामी ‘लाल सिंग चड्ढा’ हा सिनेमा आमिर आणि किरण दोघे मिळवून बनवत आहेत. त्यामुळे ते चित्रपटाच्या शूटिंगवर सतत सोबत होते. त्यांचे घटस्फोटानंतरही सेटवरील अनेक फोटो व्हायरल झाले होते. त्यांना आझाद हा मुलगा असून तो सरोगसीचा माध्यमातून झाला आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

आनंदाची बातमी! अभिनेत्री नयनताराने केली साखरपुड्याची पुष्टी; जाणून घ्या कोण आहे तो नशीबवान?

सोनू अभिनेत्रीसोबत करत होता ‘तुम तो ठहरे परदेसी’ गाण्यावर डान्स; मध्येच आला चाहता आणि…

मालदिवला नवऱ्यासोबत सुट्यांसाठी जात सना खानने एअरपोर्टवरच अदा केला नमाज; इंटरनेटवर व्हिडिओ व्हायरल

हे देखील वाचा