Friday, September 20, 2024
Home बॉलीवूड रक्षाबंधनाला आमिर खानने केले हे अनोखे काम, सोशल मीडियावर होतीये चर्चा

रक्षाबंधनाला आमिर खानने केले हे अनोखे काम, सोशल मीडियावर होतीये चर्चा

सोमवारी बहीण-भावाच्या प्रेमाचा सण रक्षाबंधन देशभरात मोठ्या थाटामाटात साजरा करण्यात आला. बहिणी आपल्या भावांच्या मनगटावर आपुलकीचा धागा बांधतात आणि भाऊ त्यांचे रक्षण करण्याचे वचन देतात. बॉलीवूडमध्येही हा सण खूप साजरा केला गेला आणि स्टार्सनी सोशल मीडिया पोस्टद्वारे चाहत्यांसह रक्षाबंधन उत्सवाची झलक शेअर केली. आमिर खाननेही त्याची बहीण निखत खानसोबत हा सण साजरा केला, पण थोड्या वेगळ्या पद्धतीने.

आमिर खानची (Aamir Khan) बहीण निकतनेही भावाच्या मनगटावर रक्षासूत्र बांधले आणि त्याला मिठाई खाऊ घातली. पण, आमिर खाननेही बहिणीच्या मनगटावर आपुलकीचा धागा बांधला. निखतने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर रक्षाबंधन सेलिब्रेशनचा फोटो शेअर केला आहे. पहिल्या फोटोत निखत तिचा भाऊ आमिरला राखी बांधताना दिसत आहे. दुसऱ्या फोटोत आमिर आपल्या बहिणीला राखी बांधत आहे आणि तिसऱ्या फोटोत तो तिला मिठाई खाऊ घालत आहे.

निखत खानने पोस्ट शेअर करत कॅप्शन लिहिले, ‘भाऊ आणि बहिणीमधील हे प्रेम पाहणे किती आनंददायी आहे. देव तुम्हा सर्वांना आशीर्वाद देवो. सहसा बहिणी भावांना राखी बांधतात. पण, आमिर आणि निखतची ही स्टाईल चाहत्यांनाही खूप आवडली आहे. यूजर्स आपापल्या स्टाइलमध्ये कमेंट करून अभिनेत्याचे कौतुक करत आहेत. एका यूजरने लिहिले, ‘खूप सुंदर. भाऊ-बहिणीतील हे प्रेम कायम राहो. दुसऱ्या यूजरने लिहिले की, ‘तुमचे प्रेम दररोज अधिकाधिक वाढू दे’.

निखत खान हेगडे ही आमिर खानची मोठी बहीण आहे. निखत एक प्रसिद्ध मॉडेल, अभिनेत्री आणि निर्माता आहे. ती अनेक चित्रपट आणि टीव्ही मालिकांमध्ये दिसली आहे. गेल्या वर्षी प्रदर्शित झालेल्या शाहरुख खानच्या ‘पठाण’ चित्रपटातही निखत दिसली होती. या चित्रपटात तिने शाहरुख खानच्या आईची भूमिका साकारली होती. निखतने ‘बनी चाऊ होम डिलिव्हरी’ आणि ‘जमाई राजा 2.0’ सारख्या मालिकांमध्येही काम केले आहे. निखतचे लग्न संतोष हेगडे यांच्याशी झाले आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा 

हेही वाचा – 

राजेश मापुस्कर दिग्दर्शित हा चित्रपट १० ॲाक्टोबरला होणार प्रदर्शित
‘अल्फा’मध्ये या सुपरस्टारची एन्ट्री! चित्रपट सुपरहिट करण्यासाठी निर्मात्यांनी लावली मोठी पैज

हे देखील वाचा