काय सांगता! चक्क आमिर खानने मागितली केजीफ स्टार यशची माफी


बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट म्हणून ओळखला जाणारा सुपरस्टार आमिर खानच्या प्रत्येक चित्रपटाची फॅन्स आतुरतेने वाट बघत असतात. आमिर नेहमीच इतरांपेक्षा हटके आणि पठडीबाहेरील विषय हलक्याफुलक्या पद्धतीने प्रेक्षकांसमोर मांडतो. याचमुळे आमिरचे सिनेमे सर्वांसाठी कोणत्याही पर्वणीपेक्षा कमी नसतात. लवकरच आमिरचा ‘लालसिंग चड्ढा’ सिनेमा प्रदर्शित होणार आहे. या सिनेमाच्या प्रदर्शनाची तारीख जाहीर झाली आहे. हा सिनेमा येत्या १४ एप्रिल २०२२ रोजी आमिरचा हा बहुप्रतीक्षित सिनेमा प्रदर्शित होणार आहे. या सिनेमात आमिरसोबत करीना कपूर खान दिसणार आहे. हा सिनेमा पाहण्यासाठी सर्वच प्रेक्षक खूपच उत्साहित आहे. मात्र ‘लालसिंग चड्ढा’ हा सिनेमा ज्या दिवशी प्रदर्शित होणार आहे, त्याच दिवशी दाक्षिणात्य सुपरस्टार असणाऱ्या यशचा बहुचर्चित ‘केजीएफ २’ देखील प्रदर्शित होणार आहे.

त्यामुळे १४ एप्रिल रोजी दोन मोठ्या चित्रपटांची बॉक्स ऑफिसवर जोरदार धडक पाहायला मिळणार आहे. या क्लॅशसाठी आमिर खानने ‘केजीफ २’चे मेकर्स आणि अभिनेता यश यांची माफी मागितली आहे. एका रिपोर्टनुसार आमिर खानने त्याच्या एका मुलाखतीमध्ये ‘लालसिंग चड्ढा’ एप्रिलला प्रदर्शित होत असल्यामुळे आमिरने ‘केजीफ २’चे मेकर्स आणि यशची माफी मागितली आहे.

आमिरने या मुलाखतीमध्ये सांगितले की, “आमचा सिनेमा व्हिजुअल इफेक्टच्या कारणांमुळे प्रदर्शत होण्यास वेळ लागत आहे. आमच्याकडे दोन पर्याय होते, एकतर आम्ही घाईघाईमध्ये सिनेमा प्रदर्शित करणे आणि दुसरा म्हणजे वेळ घेऊन क्वालिटी काम देणे. मला घाई अजिबात आवडत नाही, त्यामुळे आम्ही दुसऱ्या पर्यायासोबत पुढे जायचे ठरवले. आम्ही एप्रिलला सिनेमा प्रदर्शित करणार आहोत.

पुढे आमिर खानने सांगितले, “केजीफ २ सोबत सिनेमा प्रदर्शित होत असल्यामुळे मी खूपच दुखी आहे. यातच मी अभिनेता यशसोबत एक डील केली आहे, की मी यशचा केजीफ देखील प्रमोट करणार आहे. मी कधीच दुसऱ्या सिनेमासोबत माझा सिनेमा प्रदर्शित करत नाही. मात्र हे देखील खरे आहे की, मी ‘लालसिंग चड्ढा’च्या निमित्ताने पहिल्यांदा शीख भूमिका साकारत आहे, त्यामुळे मला हा सिनेमा प्रदर्शित करण्यासाठी ‘बैसाखी’ पेक्षा उत्तम दिवस कोणताही मिळाला नाही. मी तर केजीफ २ चित्रपटगृहात जाऊन बघणार असल्याचे देखील सांगितले.”

‘केजीफ २’ आणि ‘लालसिंग चड्ढा’ हा दोन्ही सिनेमे खूपच वेगळे आहेत. केजीफ हा ऍक्शन सिनेमा तर लालसिंग चड्ढा लव्हस्टोरी आहे. त्यामुळे दोन्ही चित्रपटांच्या व्यवसायावर कोणताही परिणाम होणार नसल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे. मात्र नक्की काय होईल हे तर १४ एप्रिललाच समजेल.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-किसिंग सीनमध्ये लारा दत्ताला नाही कोणतीही अडचण, सांगितली कशी होती पती महेश भूपतीची प्रतिक्रिया

-अतरंगी कथा असणाऱ्या आणि प्रेमाचा त्रिकोण दाखवणाऱ्या ‘अतरंगी रे’ सिनेमाचा धमाल ट्रेलर रिलीझ

-हाय गर्मी! मोनालिसाने मिनी स्कर्ट घालून केला जबरदस्त डान्स, ओलांडल्या बोल्डनेसच्या सर्व मर्यादा


Latest Post

error: Content is protected !!