Friday, March 29, 2024

हाय गर्मी! मोनालिसाने मिनी स्कर्ट घालून केला जबरदस्त डान्स, ओलांडल्या बोल्डनेसच्या सर्व मर्यादा

टीव्ही मालिकांमध्ये आपल्या दमदार अभिनयासाठी ओळखली जाणारी भोजपुरी अभिनेत्री मोनालिसा तिच्या सौंदर्यामुळे चर्चेत असते. मोनालिसा सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. ती नेहमीच चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी धडपड करत असते. म्हणूनच ती सतत सोशल मीडियावर तिचे फोटो आणि व्हिडिओ शेअर करत असते. तिने सोशल मीडियावर पोस्ट करताच ती चर्चेचा विषय बनत असते. अलीकडेच मोनालिसाने तिचा वाढदिवस साजरा केला, ज्याचे अनेक फोटो तिने चाहत्यांबरोबर शेअर केले. हे फोटो पाहून अंदाज बांधता येतो की, मोनालिसाचा वाढदिवस किती खास असेल.

मोनालिसाने आता वाढदिवसानंतर त्याच ड्रेसमध्ये डान्स करतानाचा व्हिडिओ शेअर केला आहे. यामध्ये मोनालिसा खूपच हॉट दिसत आहे. तिने गुडघ्यांच्या वर जांभळ्या रंगाचा स्कर्ट परिधान केला आहे. ज्यामध्ये तिचे टोन्ड पाय दिसत आहेत. याशिवाय तिने प्रिंटेड रंगाचा क्रॉप टॉप परिधान केला आहे. मोनालिसाचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. व्हिडिओमध्ये अभिनेत्री खूपच बोल्ड दिसत आहे.

या व्हिडिओमध्ये ‘नाजा’ गाण्यावर अभिनेत्रीने जबरदस्त डान्स केला आहे. रील व्हिडिओ पोस्ट करताना, तिने कॅप्शन लिहिले की, “लव्ह ग्रूविंग इन द लेटेस्ट वन.” तसेच मोनालिसाने इंस्टाग्राम स्टोरीवर हा डान्स शेअर केला आहे. तिच्या या व्हिडिओला आतापर्यंत २७ हजारांहून अधिक लाईक्स मिळाले आहेत.

मोनालिसा कोणताही व्हिडिओ अपलोड करते, तेव्हा युजर्स त्यावर अनेक कमेंट करतातच. मोनालिसाच्या या व्हिडिओवरही अनेक कमेंट्स आल्या आहेत. अनेक युजर्सनी इमोजी वापरून आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत, तर अनेकांनी मोनालिसाच्या डान्सचे कौतुक केले आहे. त्याचवेळी, वाढदिवसानिमित्त शेअर केलेल्या फोटोंमध्ये मोनालिसा खूपच स्टनिंग दिसत होती आणि वेगवेगळ्या स्टाईलमध्ये किलर पोझ देत होती. मोनालिसाने आपले केस मोकळे सोडून आणि स्पोर्ट्स शूज घातला आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-बॉलिवूड गाजवणाऱ्या अभिनेत्रीचा बालपणीचा फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल, क्यूटनेस पाहून चाहतेही दंग

-स्वातंत्र्याबाबतच्या वक्तव्यावर अभिनेते मुकशे खन्नांकडून कंगनाची खरडपट्टी, अभिनेत्रीच्या वक्तव्याला म्हटले, ‘बालिश’

-एफआयआर दाखल केल्याची माहिती देताना कंगनाने शेअर केला तिचा बोल्ड फोटो

हे देखील वाचा