Wednesday, June 26, 2024

BIRTHDAY SPECIAL | ‘आम्ही जवळपास अर्धा तास एकमेकांसोबत…’, आमिर खानने स्वतः केला किरणबद्दलच्या नात्याचा खुलासा

बॉलिवूड अभिनेता आमिर खान याने त्याच्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनात एक खास स्थान निर्माण केले आहे. त्याचा चित्रपट येणार म्हणजे नक्कीच काहीतरी खास असणार असणार याची प्रेक्षकांना माहिती असते. आपल्या चित्रपटा सोबतच तो त्याच्या वैयक्तिक आयुष्याबाबत बराच चर्चेत असतो. तसेच त्याने केलेले सामाजिक कार्य देखील चर्चेत असते. त्याच्या वैयक्तिक आयुष्याबाबत बोलायचे झाल्यास, आमिर खानने किरण रावसोबत दुसरे लग्न केले आहे. मागच्या वर्षी त्यांच्या लग्नाला 15 वर्ष पूर्ण झाले आहे. 15 डिसेंबर 2005 मध्ये किरण आणि आमिर यांनी लग्न केले होते. तसे तर तो आपल्या वैयक्तिक आयुष्याबाबत जास्त बोलत नाही. अशातच मंगळवारी (14मार्च)ला तो त्याच्या वाढदिवस साजरा करत आहे. चला तर यानिमित्त जाणून घेऊया मिस्टर परफेक्शनिस्टची लव्ह लाईफ…

आमिरने (Aamir Khan) एका मुलाखतीमध्ये सांगितले आहे की, “माझी आणि किरणची भेट लगान या चित्रपटाच्या सेटवर झाली होती. त्यावेळी किरण माझ्यासाठी केवळ एक टीमची मेंबर होती. त्यावेळी ती सहाय्यक दिग्दर्शक होती. रीनापासून घटस्फोट घेतल्यानंतर माझी जेव्हा किरण सोबत ओळख झाली, तेव्हा आम्ही फक्त मित्र होतो,” असे आमिरने सांगितले. (aamir khan celebrate his birthday lets know about his love life)

यानंतर आमिरने सांगितले की, “एक दिवस किरणचा कॉल आला, तेव्हा आम्ही जवळपास अर्धा तास एकमेकांशी बोलत होतो. का माहित नाही पण किरणसोबत बोलल्यानंतर मला खूपच आनंद झाला. त्या कॉल नंतर मी किरणला डेट करायला सुरुवात केली होती. त्यानंतर 1 ते 2 वर्ष आम्ही एकमेकांना डेट करत होतो. त्यांनतर मला या गोष्टीची जाणीव झाली की, मी तिच्याशिवाय माझ्या आयुष्याची कल्पनाच करू शकत नाही. तिच्यामधील सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे तो एक खूप स्ट्राँग महिला आहे. त्यानंतर आम्ही आमच्या नात्याला नावं दिले. आणि लग्न करण्याचा निर्णय घेतला.”

आमिरने आपल्या पहिल्या बायकोबद्दल देखील अनेक गोष्टींचा खुलासा केला. तो म्हणतो की, “रीना ही देखील एक स्ट्राँग महिला होती. मला त्या व्यक्ती खूप आवडतात ज्या स्ट्राँग असतात. ती एक चांगली व्यक्ती होती. परंतु आमचं नात नाही टिकू शकलं. आमचा घटोस्पोट होऊनही माझ्या मनात तिच्याबद्दल खूप प्रेम आणि आदर आहे.”(aamir khan celebrate his birthday lets know about his love life)

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
दिग्गजांविरुद्ध मिटू कॅम्पेनमध्ये उतरणाऱ्या अभिनेत्रीच्या जीवाला धोका, इंस्टाग्राम पोस्ट करून उडवली खळबळ

करोडोंच्या फसवणुकीचा आरोप असलेल्या सुकेशवर बनणार बॉलिवूड चित्रपट, जॅकलिन साकारणार मुख्य भूमिका?

हे देखील वाचा