Friday, September 20, 2024
Home बॉलीवूड आमिरने साजरं केलं मुलाचं यश ! ‘महाराज’च्या सक्सेस पार्टीचे फोटोज व्हायरल

आमिरने साजरं केलं मुलाचं यश ! ‘महाराज’च्या सक्सेस पार्टीचे फोटोज व्हायरल

आमिर खानचा (Aamir Khan) मुलगा जुनैद खान याने ‘महाराज’ या चित्रपटातून हिंदी चित्रपटसृष्टीत प्रवेश केला आहे. या चित्रपटात त्याच्यासोबत जयदीप अहलावत आणि शर्वरी वाघ यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत. सिद्धार्थ पी मल्होत्रा ​​दिग्दर्शित, या चित्रपटाला चाहत्यांकडून तसेच बहुतेक समीक्षकांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाला.

या चित्रपटाला मिळालेल्या प्रेमानंतर जुनैद त्याच्या आगामी चित्रपटात व्यस्त झाला, परंतु त्याचे वडील आमिर खान यांनी आपल्या मुलाचे शानदार पदार्पण सेलिब्रेट करण्याची संधी सोडली नाही. चित्रपटाचे यश साजरे करतानाचे न पाहिलेले फोटो सोशल मीडियावर आता व्हायरल झाले आहेत.

फोटोत आमिर खान, जुनैद खान, जयदीप अहलावत, शालिनी पांडे आणि महाराज दिग्दर्शक सिद्धार्थ पी. मल्होत्रा ​​हसत हसत सेल्फी काढताना दिसत आहेत. या चित्रपटाच्या यशाने सर्वांच्या चेहऱ्यावर आनंद दिसत आहे.

वर्क फ्रंटबद्दल बोलायचे झाले तर जुनैद खान लवकरच सई पल्लवीसोबत रोमँटिक एंटरटेनर चित्रपटात दिसणार आहे, ज्याचे नाव ‘एक दिन’ आहे. या वर्षी मार्चमध्ये टीमने शूटिंग पूर्ण केले. याशिवाय जुनैद खान बोनी कपूर आणि श्रीदेवी यांची धाकटी मुलगी खुशी कपूरसोबत एका चित्रपटात काम करत आहे. गेल्या महिन्यात या दोघांनी त्यांच्या रोमँटिक चित्रपटाचे शूटिंग दिल्लीत सुरू केले आहे. अद्वैत चंदन दिग्दर्शित हा चित्रपट ‘लव्ह टुडे’ या हिट तमिळ चित्रपटाचा अधिकृत रिमेक आहे.
आमिर खानबद्दल बोलायचे झाले तर लाल सिंग चड्ढाच्या अपयशानंतर तो सध्या अभिनयापासून दूर आहे. अभिनेता लवकरच “सितारे जमीन पर” या चित्रपटातून पुनरागमन करणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन आर. एस. प्रसन्ना यांनी केले आहे. या चित्रपटात आमिर सोबत जेनेलिया देशमुखही आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा-

तब्बल २३ वर्षांनी महेश बाबूचा चित्रपट होणार प्रदर्शित, ‘मुरारी’ साठी चाहते झालेत उत्सुक
‘तू एक उत्कृष्ट कर्णधार आहेस…’ चिन्मय मांडलेकरची सुर्याकुमार यादव साठी खास पोस्ट

हे देखील वाचा