Wednesday, June 26, 2024

आमिरच्या लेकीने आजीबाईंशी घालून दिली बॉयफ्रेंडची भेट; चाहते म्हणाले, ‘मग कधी उरकताय?’

बॉलिवूड अभिनेता आमिर खान याची मुलगी आयरा खान नेहमीच चर्चेत असते. सोशल मीडियावरही ती खूप सक्रिय असते. आता तिने तिची आजी झीनत हुसैनसोबत काही फोटो शेअर केले आहेत, पण हे फोटोदेखील खास आहेत. कारण, त्यात आयराची बॉयफ्रेंड नुपूर शिखरे देखील दिसत आहे. आमिरच्या मुलीने आजीला तिच्या प्रियकराची भेट घडवून आणली, ज्यानंतर लोक विचारत आहेत की, दोघे लग्न करणार आहेत का?

आयरा खान (Ira Khan) गेल्या दोन वर्षांपासून नुपूर शिखरे (Nupur Shikhare) याला डेट करत आहे. दोघेही अनेकदा सोशल मीडियावर एकमेकांसोबतचे फोटो शेअर करून आपले प्रेम व्यक्त करत असतात. आता आयराने तिचा प्रियकर नुपूरची आजी झीनत हुसैन (आमिरची आई) यांच्याशी ओळख करून दिली आहे.

इंस्टाग्रामवर फोटो शेअर करताना आयराने कॅप्शनमध्ये लिहिले की, “रँडम आनंदी फोटो.”

 

View this post on Instagram

 

A post shared by Ira Khan (@khan.ira)

आयरा, नुपूर आणि झीनत हे तिघेही हसत हसत पोझ देत आहेत आणि फोटो क्लिक करत आहेत. यावर एका चाहत्याने “किती खुश आहेत फोटोत,” अशी कमेंट केली. त्याचवेळी दुसऱ्या एका चाहत्याने विचारले की, “तुम्ही दोघे लग्न करणार आहात का?”

आयरा आणि नुपूर ज्याप्रकारे एकमेकांच्या जवळ आहेत, त्याचप्रमाणे त्या एकमेकांच्या कुटुंबाच्याही खूप जवळ आहेत. आयराने दिवाळी नुपूर आणि त्याच्या कुटुंबासोबत साजरी केली होती. त्याचवेळी, नुपूरनेही गेल्या वर्षी ख्रिसमसच्या सेलिब्रेशनमध्ये आयरा आणि आमिर खान (Amir khan) याच्यासोबत सहभाग घेतला होता.

या जोडप्याने गेल्या वर्षी त्यांचे नाते अधिकृत केले. ‘प्रॉमिस डे’च्या दिवशी नुपूरसोबतचा फोटो शेअर करताना आयराने तिच्या अफेअरची माहिती संपूर्ण जगाला दिली. काही दिवसांपूर्वी, अफेअरला २ वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त आयराने नुपूरसोबतची एक भावनिक पोस्टही शेअर केली होती.

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

हेही वाचा-

विमानतळावर दिसल्या बच्चन मायलेकी; आराध्याची उंची पाहून नेटकरीही म्हणाले, ‘ही लवकरच…’

‘वो तेरे प्यार का गम’, अमृता फडणवीसांच्या नवीन गाण्याची चाहत्यांना भुरळ, तब्बल ‘इतक्या’ लोकांनी पाहिला व्हिडिओ

ढळला पदर खिळल्या नजरा! प्राजक्तानंतर मराठी अभिनेत्रीच्या बोल्ड फोटोंची सोशल मीडियावर चर्चा

हे देखील वाचा