Sunday, July 14, 2024

‘आयरा खानला हात लावू नकोस” नुपूर शिखरेला मिळाली धमकी, यावर त्याने व्हिडिओ शेअर करत दिला रिप्लाय

आमिर खानची मुलगी असलेली आयरा खान जरी बॉलिवूडमध्ये नसली तरी तिची लोकप्रियता आणि प्रसिद्धी कोणत्याही बॉलिवूड कलाकारापेक्षा कमी नाही. तिला सोशल मीडियावर तुफान फॅन फॉलोविंग आहे. आयरा तिच्या रिलेशनशिपमुळे आणि तिच्या बॉयफ्रेंडसोबतच्या पोस्टमुळे कायम लाइमलाईटमध्ये असते. आयरा पुन्हा एकदा तिच्या बॉयफ्रेंडमुळेच चर्चेत आली आहे. आयराचा बॉयफ्रेंड असलेल्या नुपूर शिखरेने त्याच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून एक व्हिडिओ शेअर केला असून, या व्हिडिओमुळे ते दोघेही इंटरनेटवर गाजत आहे.

आयरा खान नुपूर शिखरेला डेट करत असल्याचे तिने मागच्या वर्षीच जाहीर केले होते. ते दोघेही सोशल मीडियावर तुफान सक्रिय असून सतत एकमेकांचे फोटो, व्हिडिओ शेअर करतात. त्यांच्या फॅन्सला हे सर्व खूपच आवडत असल्याने त्यांच्या पोस्ट खूप व्हायरल देखील होतात. नुकताच नुपूरने त्याच्या अकाऊंटवरून एक मजेशीर व्हिडिओ पोस्ट केला असून, तो व्हिडिओ सोशल मीडियावर खूपच व्हायरल होत आहे. या व्हिडिओमधून नुपूरने त्याला आलेल्या एका मेसेजचा रिप्लाय मजेशीर पद्धतीने दिला आहे.

नुपूरला त्याच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर एक मेसेज आला ज्यात लिहिले होते की, ‘आयरा माझे प्रेम आहे, तिला हात देखील लावू नको ‘ हा मेसेज वाचल्यानंतर नुपूर उठतो आणि काहीतरी काम करत असलेल्या आयराला बोटाने हात लावतो आणि निघून जातो. पुन्हा तो येतो आणि आयराला किस करतो. हा व्हिडिओ शेअर करताना नुपूरने लिहिले, “तू हात लावू शकत नाही.” यासोबत त्याने काही हॅशटॅग देखील दिले आहेत.

आयरा बॉलिवूडमध्ये नसली तरी तिने एका नाटकाचे दिग्दर्शन केले असून, तिला अभिनेत्री नाही तर दिग्दर्शिका व्हायचे आहे. तिने युवराज सिंगची पत्नी असलेल्या हेजल कीचसोबत काम देखील केले आहे. आयराही आमिर खान आणि त्याची पहिली पत्नी असलेल्या रीना दत्ताची मुलगी आहे.

हेही वाचा :

हे देखील वाचा