Tuesday, May 28, 2024

‘एवढा शो-ऑफ कशासाठी?’, आमिर खानची मुलगी साखरपुड्यामध्ये ट्रोल…व्हिडिओ होतोय व्हायरल

बॉलिवूडचा प्रसिद्ध अभिनेता आमिर खान याची मुलगी आयरा खान हिने नुकतंच आपला बॉयफ्रेंड नुपुर शिखरे याच्यासोबत शुक्रवार (दि, 18 नोव्हेंबर) रोजी गुपचुप साखरपुडा उरकला आहे.आयरा खान एका अभिनेत्याची मुलगी असली तरी तिने अजुन अभिनय क्षेत्रामध्ये पाय ठेवला नाही. मात्र, तरीही ती सतत प्रेक्षकांचे लक्ष वेधत असते. आयरा सोशल मीडियावर खूप सक्रिय असते

प्रसिद्ध अभिनेता आणि दिग्दर्शक अभिनेता आमिर खान (Amir Khan) याची मुलगी आयरा खान (Ira Khan) हिने नुकतंच आपला बॉयफ्रेंड नुपुर शिखरे (Nupoor Shikhare) याच्या सोबत साखरपुडा केला आहे. नुपुर हा बॉलिवूड इंडस्ट्रीमधील जिम ट्रेनर म्हणून ओळखला जातो. त्याने इंडस्ट्रीमधील अनेक कलाकारांना चित्रपटासाठी तयार केले आहे.

काही दिसांपूर्वीच सोशल मीडियावर एक व्हिडिओ तुफान व्हायरल झाला होता, ज्यामध्ये नुपुरने आयरला फिल्मी स्टाइलने प्रपोज केले होते. या व्हिडिओमुळे यांचे नाते जगासमोर आले. काही दिवस या दोघांनी एकमेकांना डेट केलं आणि आता अचानक साखरपुडा करुन त्यांनी प्रेक्षकांना आश्चर्यचकित केले असून पुन्हा एकदा प्रेक्षकांचे लक्ष वेधले आहे.

 

View this post on Instagram

 

आमिर खानची लाडकी आयरा खान हिच्या साखरपुड्यामध्ये मोजक्या पाहुण्यांनाच आमंत्रित केले होते. सोशल मीडियावर साखरपुड्याचे फोटो तुफान व्हायरल होत असून दोघांची जोडी देखिल खूपच भारी दिसत होती. मात्र, काही युजरने आयराच्या ड्रेसवरुन तिला ट्रोल केले आहे. साखरुपुड्याच्या खास दिवशी आयराने शोल्डर लेस टेक्सीको ड्रेस परिधान केला होता. मात्र, खास क्षणाला तिने अशा प्रकारचे कपडे परिधान नव्हते करायला पाहिजे,असे काही युजरचे म्हणने आहे.

 

View this post on Instagram

 

तिचे फोटो शेअर करत तिला नको त्या कमेंट करुन ट्रोल केलं जात आहे. एका युजरने कमेंट करत लिहिले की, “अरे ताई साखरपुड्यादिवशी तरी चांगले कपडे घालायचे ना! एवढा का शोऑफ करायचा आहे?” दुसऱ्या युजरने लिहिले की, हिचे वडील नव्हते आले का मुलीच्या साखरपुड्यामध्ये? अजून एकाने लिहिले की, “आज तरी चांगले कपडे घालायचे काय माहीत लग्नाला काय करेल,” एका अन्यने लिहिले की, “अरे ही तर आमिर खानची मुलगी आहे, “तरच एवढा भारी संस्कारी ड्रेस घातला आहे.” अशाप्रकारच्या कमेंटने आयराला ट्रोल करत तिने परिधान केलेल्या ड्रेसची खिल्ली उडवली जात आहे.

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक कर
हेही वाचा-
एक्स बॉयफ्रेंडने सुश्मिताला दिल्या हटके शुभेच्छा, सोशल मीडियावर फोटो होतोय तुफान व्हायरल
‘माझ्या आज्जी-आजोबांनी खूप चांगले वळण लावले..’,म्हणत प्रतिक बब्बरने व्यक्त केला अभिमान

हे देखील वाचा