Monday, May 27, 2024

आमिर खानची लेक आयरा बसली बॉयफ्रेंडच्या कुशीत, दोघांचेही रोमँटिक फोटो सर्वत्र व्हायरल

बॉलिवूडचा ‘मिस्टर पर्फेक्शनिस्ट‘ म्हणून ओळखला जाणारा आमिर खान हा जेवढा चर्चेत असतो, तेवढीच त्याची मुलगी आयरा खान हीदेखील चर्चेत असते. आमिर खानची मुलगी आयरा खान हिने बॉलिवूड पदार्पण केले नाहीये, पण ती कोणत्याही अभिनेत्रीप्रमाणे नेहमीच सर्वांचे लक्ष वेधून घेते. बिनधास्त अंदाजासाठी ओळखली जाणारी आयरा खान ही तिच्या लव्ह लाईफमुळेही चर्चेत असते. ती मागील 2 वर्षांपासून नुपूर शिखरे याला डेट करत आहे. आयरा खान बॉयफ्रेंड नुपूर शिखरे याच्यासोबतचे फोटो नेहमी सोशल मीडियावर शेअर करत असते. अशात आयराच्या लेटेस्ट फोटोंनी सोशल मीडियावर धुमाकूल घातला आहे.

आयराने बॉयफ्रेंडसोबतचे फोटो केले शेअर
खरं तर, आमिर खान (Aamir Khan) याची मुलगी आयरा खान (Ira Khan) हिने तिचा बॉयफ्रेंड नुपूर शिखरे (Nupur Shikhare) याच्यासोबतचे रोमँटिक फोटो शेअर केले आहेत. या फोटोत आयरा आणि नुपूर एकमेकांकडे प्रेमाने पाहत आहेत. दोघेही एकाच काऊचवर आहेत आणि यादरम्यान नुपूरच्या हातात एक कपही आहे. तसेच, आयरा त्याच्या कुशीत बसली आहे आणि त्याच्याकडे एकटक बघत आहे. आयराचे बॉयफ्रेंड नुपूरसोबतचे फोटो आता जोरदार व्हायरल होत आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by Ira Khan (@khan.ira)

गुडघ्यावर बसून केले होते नुपूरने प्रपोज
काही दिवसांपूर्वी आयराचा बॉयफ्रेंड नुपूर शिखर याने त्याच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर एक व्हिडिओ शेअर केला होता. यामध्ये त्याने फिल्मी अंदाजात आयराला प्रपोज केले होते. या व्हिडिओत नुपूर शिखरे गुडघ्यावर बसून आयराला प्रपोज करताना दिसला होता. आयराने हो म्हटल्यानंतर नुपूरने तिच्या बोटात अंगठी घातली होती. यानंतर आयरा नुपूरला किस करताना दिसली होती.

 

View this post on Instagram

 

A post shared by Ira Khan (@khan.ira)

कोण आहे नुपूर शिखरे?
नुपूर शिखरे हा आमिर खान याचा फिटनेस ट्रेनर राहिला आहे. तसेच, त्याने लॉकडाऊनमध्ये आयरा खान हिलाही ट्रेनिंग दिली होती. तसेच, तिला फिट बनण्यासाठी मदत केली होती. यादरम्यानच आयरा आणि नुपूरमध्ये जवळीकता वाढली होती. यानंतर आयरा नेहमीच नुपूरसोबत आपले फोटो शेअर केले होते. काही महिन्यांनंतर या दोघांच्या अफेरच्या बातम्यांना दुजोरा दिला होता. तेव्हापासून दोघेही एकमेकांसोबत चांगला वेळ घालवतात. तसेच, अनेक ठिकाणी एकत्र स्पॉट होतात. आता त्यांचे लेटेस्ट फोटो सर्वांचे लक्ष वेधत आहेत.

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
अधिक वाचा-
एक्स बॉयफ्रेंडच्या कॉन्सर्टमधील केंडल जेनरचा ‘तो’ व्हिडिओ पाहाच, सर्वत्र होतोय व्हायरल
व्हिडिओ: ‘पुष्पा’ची क्रेझ अजूनही कायम, भारतीयांचं सोडाच; थेट कोरियन मुलीनेही धरला ‘श्रीवल्ली’वर ठेका

हे देखील वाचा