Sunday, June 8, 2025
Home बॉलीवूड Laal Singh Chadha | ‘कहानी’ गाण्याचा व्हिडिओ रिलीझ, आमिर खानचा निरागसपणा पाहून व्हाल दंग

Laal Singh Chadha | ‘कहानी’ गाण्याचा व्हिडिओ रिलीझ, आमिर खानचा निरागसपणा पाहून व्हाल दंग

‘लाल सिंग चड्ढा’च्या निर्मात्यांनी अखेर ‘कहानी’ या गाण्याचा बहुप्रतिक्षित व्हिडिओ रिलीझ केला आहे. या गाण्याचे ऑडिओ व्हर्जन मोहनने गायले आहे, तर गाण्याच्या म्युझिक व्हिडिओला सोनू निगमने (Sonu Nigam) आवाज दिला आहे. या गाण्याला देशभरातून प्रेम आणि प्रशंसा मिळाली आहे आणि या वर्षी रिलीझ झालेल्या सर्वात सूदिंग गाण्यांपैकी एक मानले जाते.

व्हिडिओसह हे गाणे आणखी सुंदर आणि अर्थपूर्ण दिसते, यात शंका नाही. या गाण्यात आमिर खानचा (Aamir Khan) अभिनय अप्रतिम आहे. हा व्हिडिओ जितका हृदयस्पर्शी आहे, तितकाच जणू काही कोड्याचे तुकडे प्रेक्षकांच्या डोळ्यासमोर येत आहेत. प्रीतम (Preetam) यांनी संगीतबद्ध केलेल्या ‘कहानी’ ऑडिओ व्हर्जनला आणि अमिताभ भट्टाचार्य (Amitabh Bhattacharya) यांनी लिहिलेल्या गीतांना सर्व बाजूंनी प्रेम मिळाले आहे. हे गाणे रिलीझ झाल्यापासून २४ तासांच्या आत इंटरनेटवरील सर्वात लोकप्रिय गाण्यांपैकी एक बनले आहे आणि ट्रेंडिंग आहे. (aamir khan film laal singh chaddha song kahani music video release)

अशा परिस्थितीत, आमिर खानने संगीतकार, गायक, गीतकार आणि तंत्रज्ञांना चर्चेत ठेवता यावे, म्हणून त्याच्या आगामी चित्रपटाची सर्व गाणी म्युझिक व्हिडिओशिवाय रिलीझ केली होती. त्याने आत्तापर्यंत ‘कहानी’, ‘मैं की करां?’, ‘फिर ना ऐसी रात आएगी’ आणि ‘तूर कलेयां’ ऑडिओ व्हर्जनमध्ये रिलीज केले आहेत. तसेच निर्मात्यांनी पहिल्यांदाच म्यूझिक व्हिडिओ रिलीझ केला आहे.

आमिर खान प्रॉडक्शन, किरण राव (Kiran Rao)आणि वायकॉम 18 स्टुडिओज निर्मित, ‘लाल सिंग चड्ढा’ मध्ये करीना कपूर (Kareena Kapoor), मोना सिंग (Mona Singh) आणि नागा चैतन्य (Naga Chaitanya) देखील आहेत. हा चित्रपट ‘फॉरेस्ट गंप’चा अधिकृत रिमेक आहे. लाल सिंग चड्ढा ११ ऑगस्ट २०२२ रोजी रिलीझ होणार आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा

हे देखील वाचा