बॉलिवूडचा मिस्टर पर्फेक्शनिस्ट म्हणून ओळखला जाणारा अभिनेता आमिर खान सध्या त्याच्या वैयक्तिक आणि व्यायसायिक अशा दोन्ही आयुष्यामुळे चांगलाच प्रकाशझोतात आला होता. आमिर सध्या लडाखमध्ये त्याच्या आगामी ‘लाल सिंग चड्ढा’ चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. अनेकदा आमिरचे शूटिंग सेटवरचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होताना आपण पाहिले आहे.
आमिर खानने नुकतेच तो आणि किरण राव वेगळे होत असल्याचे जाहीर केले आणि सोबतच इंडस्ट्रीमध्ये चांगलीच खळबळ माजली. १५ वर्षांचा संसार त्यांनी मोडल्यानंतरही नुकतेच आमिर आणि किरण एकत्र स्पॉट झाले आहे. लाल सिंग चड्ढा सिनेमाच्या लडाखला झालेल्या शूटिंग दरम्यान हे दोघेही एकत्रच होते. नुकताच या दोघांचा एक नवीन व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमध्ये हे दोघेही लडाखचा पारंपरिक पोशाख कोस आणि सुल्मा घालून तेथील स्थानिक लोकांसोबत डान्स करताना दिसत आहेत.
या व्हिडिओमध्ये आपण पाहू शकतो की, आमिरने जांभळ्या रंगाच्या टोपीसह लाल रंगाचा पोशाख घातला आहे, तर किरणने हिरव्या रंगाच्या टोपीसह गडद गुलाबी रंगाचा ड्रेस घातला आहे. तेथील एक स्थानिक स्त्री त्यांना नृत्य शिकवत आहे आणि आमिर, किरण तिला पाहून नृत्य करत आहेत. त्यांना हा डान्स करताना पाहून तेथील लोकं जोरजोरात ओरडत आहे. आमिर आणि किरण देखील हे सर्व एन्जॉय करताना दिसत आहेत.
याआधी देखील आमिरचा आणखी एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. या व्हिडिओत आमिर काही लहान मुलांसोबत ‘3 इडियट्स’ या चित्रपटातील ‘ऑल इज वेल’ या गाण्यावर डान्स करताना दिसत आहे.
या बहुप्रतीक्षित आणि बहुचर्चित सिनेमात आमिरसोबत करीना कपूर खान, दाक्षिणात्य सुपरस्टार नागार्जुन अक्किनेनी यांचा मुलगा अभिनेता नागा चैतन्य मुख्य भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटातून तो बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. हा सिनेमा हॉलिवूडचा प्रसिद्ध चित्रपट ‘फॉरेस्ट गम्प’ यावर आधारित आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन अद्वैत चंदन करत आहेत.
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-