Sunday, April 19, 2026
Home बॉलीवूड भारीच ना! गीता बसरा अन् हरभजन सिंग झाले त्यांच्या नुकत्याच जन्मलेल्या मुलासोबत स्पॉट, व्हिडिओ व्हायरल

भारीच ना! गीता बसरा अन् हरभजन सिंग झाले त्यांच्या नुकत्याच जन्मलेल्या मुलासोबत स्पॉट, व्हिडिओ व्हायरल

भारतीय क्रिकेट संघाचा माजी फिरकीपटू हरभजन सिंग आणि त्याची पत्नी गीता बसरा हे दोघे दुसऱ्यांदा आई बाबा झाले आहेत. याची बातमी स्वतः हरभजनने सोशल मीडियावर दिली होती. गीताने 10 जुलैला एका गोंडस मुलाला जन्म दिला आहे. ती हॉस्पिटलमध्येच होती. तिला आज हॉस्पिटलमधून डिस्चार्ज मिळाला आहे. गीता हरभजन सिंगसोबत हॉस्पिटलच्या बाहेर त्यांच्या बाळासोबत स्पॉट झाली आहे. त्यांचा हा व्हिडिओ जोरदार व्हायरल होत आहे.

व्हायरल भयानीने हा व्हिडिओ त्याच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये हरभजन सिंग, गीता, त्यांची मोठी मुलगी हिनाया आणि मुलगा दिसत आहे. परंतु या व्हिडिओमध्ये त्यांच्या बाळाची झलक दिसत आहे. हरभजनच्या हातात असलेल्या बास्केटमध्ये त्यांचे बाळ आहे. (Geeta basra and Harbhajan Singh spotted with their newly born baby)

या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, पॅपराजी लांबूनच हरभजनला शुभेच्छा देताना दिसत आहेत आणि त्यांचे फोटो काढत आहेत. या व्हिडिओमध्ये गीता खूप सुंदर दिसत आहे. तिने पांढऱ्या रंगाचा ड्रेस परिधान केला आहे. तिच्या मुलीने देखील तसाच ड्रेस घातला आहे. तसेच सगळ्यांनी मास्क लावले आहेत. त्यांचा हा व्हिडिओ प्रेक्षकांना खूप आवडला आहे. प्रेक्षक या व्हिडिओवर प्रतिक्रिया देऊन त्यांचे अभिनंदन करत आहेत.

हरभजन सिंग आणि गीता बसरा यांनी 29 ऑक्टोबर, 2015 साली लग्न केले आहे. 2016 मध्ये ते पहिल्यांदा आई-बाबा झाले होते. त्यांना 5 वर्षांची हिनाया नावाची मुलगी आहे. त्यांनी आता एका गोंडस मुलाला जन्म दिला आहे.

गीता ही एक बॉलिवूड अभिनेत्री आहे. तिने बॉलिवूडमध्ये ‘द ट्रेन’, ‘दिल दिया हैं’, ‘सेकंड हॅंड हसबंड’, ‘लॉक’, ‘भैयाजी सुपरहिट’ या चित्रपटात काम केले आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हे देखील वाचा