Monday, June 9, 2025
Home बॉलीवूड Aamir Khan | ‘लाल सिंह चड्ढा’च्या अपयशावर आमिर खानची प्रतिक्रिया; म्हणाला, ‘अपयशातून मोठा धडा शिकलो’

Aamir Khan | ‘लाल सिंह चड्ढा’च्या अपयशावर आमिर खानची प्रतिक्रिया; म्हणाला, ‘अपयशातून मोठा धडा शिकलो’

Aamir Khan| बॉलिवूड अभिनेता आमिर खान (Aamir Khan) सध्या त्याच्या व्यावसायिक आयुष्यामुळे चर्चेत आहे. ‘लाल सिंग चड्ढा’ चित्रपटाच्या अपयशानंतर अभिनेत्याने गेल्या वर्षी कामातून ब्रेक जाहीर केला होता. दरम्यान, आमिर आता चित्रपटांमध्ये पुनरागमन करणार आहे. अलीकडेच, एका संभाषणादरम्यान, अभिनेत्याने ‘लाल सिंग चड्ढा’च्या अपयशाबद्दल खुलेपणाने चर्चा केली. यासोबतच त्याने या चित्रपटाच्या अपयशातून खूप काही शिकल्याचे सांगितले.

‘लाल सिंह चड्ढा’बद्दल बोलताना आमिर खान म्हणाला, “हा माझा ड्रीम प्रोजेक्ट होता. करीना आणि माझ्या संपूर्ण टीमने या चित्रपटासाठी खूप मेहनत घेतली, पण हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर फारसा कमाल दाखवू शकला नाही.” तो पुढे म्हणाला, “बऱ्याच काळानंतर माझा हा चित्रपट अपयशी ठरला. त्यावेळी माझे कुटुंबीय आणि मित्र मी ठीक आहे का, हे विचारण्यासाठी आले. फ्लॉप झाल्यानंतर मला खूप प्रेम मिळत असल्याचे जाणवले.”

अभिनेता पुढे म्हणाला, “अपयश तुम्हाला शिकवते की तुम्ही नक्की काय चूक केली. हे तुम्हाला तुमची चूक सुधारण्याची संधी देते. या चित्रपटाचे अपयश माझ्यासाठी खूप मोठी शिकवण होती. मला आठवते मी एकदा किरणला म्हणालो होतो, ‘या चित्रपटात माझ्याकडून अनेक पातळ्यांवर खूप चुका झाल्या आहेत. सुदैवाने, मी फक्त एका चित्रपटात या चुका केल्या. मात्र, हा चित्रपट चालला नाही याचे मला खूप वाईट वाटले. 2022 मध्ये रिलीज झालेल्या लाल सिंग चड्ढा बद्दल बोलायचे तर हा चित्रपट टॉम हँक्सच्या 1994 मध्ये आलेल्या फॉरेस्ट गंपचा अधिकृत रिमेक आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन अद्वैत चंदन यांनी केले होते. या चित्रपटात आमिर खानशिवाय करीना कपूर आणि नागा चैतन्य मुख्य भूमिकेत दिसले होते.

2022 मध्ये ‘लाल सिंह चड्ढा’ चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर आमिर खानने अभिनयातून ब्रेक घेतला होता. मात्र, तो निर्माता म्हणून सक्रिय आहे. हा अभिनेता राजकुमार संतोषी आणि सनी देओलसोबत ‘लाहोर 1947’मध्ये काम करत आहे. याशिवाय अभिनेता ‘सीतारे जमीन पर’ चित्रपटात व्यस्त आहे. 2024 च्या ख्रिसमसमध्ये चित्रपटगृहात दाखल होणारा हा चित्रपट प्रदर्शित करण्याची घोषणाही आमिरने केली आहे. त्याचबरोबर आमिर खानच्या प्रॉडक्शन हाऊसचे अनेक चित्रपट एकाच वेळी धूम ठोकणार आहेत. या बॅनरवर 2024 च्या पूर्वार्धात रिलीज होणारे दोन चित्रपट आहेत, पहिला किरण राव दिग्दर्शित ‘लाप्ता लेडीज’ आणि दुसरा संजय मिश्राचा ‘प्रीतम प्यारे’.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा-

Anant Ambani: अनंत अंबानींच्या शाही प्री-वेडिंग फेस्टिव्हलला ‘हे’ अब्जाधिश लावणार हजेरी, पाहा पाहुण्यांची यादी
Crew | ‘क्रू’ चित्रपटाच्या स्टार कास्टच्या प्रेमात पडला ऋतिक रोशन, अभिनेत्रींचे कौतुक करत म्हणाला…

हे देखील वाचा