अनेक मोठमोठी खानदान अनेक दशकांपासून हिंदी चित्रपटांमध्ये सक्रिय आहे. बॉलिवूडमध्ये आजच्या घडीला अनेक भावाबहिणींच्या जोड्या आहेत. या सर्वच जोडया चित्रपटांमध्ये यशस्वी झाल्या असे नाही. या क्षेत्रात यश मिळवण्यासाठी अजोड मेहनतीसोबत लक देखील खूप महत्वाचे आहे. काहींना खूप यश आणि लोकप्रियता मिळते, मात्र काहींची गाडी जिथून सुरु होते तिथेच अडकते पुढे सरकतच नाही. अशीच एक दोन भावांची जोडी म्हणजे आमिर खान आणि फैजल खान. आमिर खान तर तुफान लोकप्रिय झाला. त्याचे सिनेमे ३००/४०० कोटींचा व्यवसाय करतात. तर दुसरीकडे फैजल चित्रपटांमध्ये आला मात्र त्याला ओळखच मिळाली नाही. आज याच फैजल खानचा वाढदिवस आहे. जाणून घेऊया त्याच्याबद्दल अधिक माहिती.
फैजलच जन्म १ सप्टेंबर १९६६ साली झाला. आज तो त्याचा ५५ वा वाढदिवस साजरा करत आहे. मुंबईत जन्मलेल्या फैजल खानचे लहानपण मुंबईतच गेले. बालकलाकार म्हणून करिअरची सुरुवात करणाऱ्या फैजलचे फिल्मी करिअर तर फ्लॉप ठरले पण चर्चेत राहिले त्याचे खासगी आयुष्यातील वाद. फैजलने अभिनयात पदार्पण केले, मात्र त्याला यश मिळाले नाही. त्याची ओळख फक्त आमिर खानचा भाऊ इतकीच बनून राहिली.
त्याने बालकलाकार म्हणून भूमिका निभावत बॉलिवूडमध्ये पदार्पण केले.‘प्यार का मौसम’ या चित्रपटात फैजलने शशी कपूर यांच्या लहानपणीची भूमिका साकारली होती. त्यानंतर विक्रम भट्ट यांच्या ‘मदहोश’ या चित्रपटातून त्याने अभिनेता म्हणून त्याची कारकीर्द सुरु केली होती. ‘मदहोश’ सिनेमानंतर त्याने तब्बल पाच वर्षांचा ब्रेक घेतला. या ब्रेकनंतर २००० साली त्याने ‘मेला’ या चित्रपटातून कमबॅक केले. या चित्रपटात फैजल भाऊ आमिरसोबत दिसला होता. या सिनेमातून त्याला लोकप्रियता आणि प्रसिद्धी तर मिळाली पण ती तेवढ्यापुरतीच. नंतर तो इंडस्ट्रीमधून गायबच झाला. नुकतीच फैजलने त्याच्या नव्या प्रोजेक्टची घोषणा केली आणि तो पुन्हा लाइमलाईट्मधे आला. फैजल त्याच्या चित्रपटांपेक्षा विवादित वक्तव्यांमुळे जास्तच चर्चेत राहिला.
फैजल २००७ साली फैलज सीजोफ्रेनिक या मानसिक आजाराने ग्रस्त असून तो नैराश्यात गेल्याच्या बातम्या आल्या होत्या. मात्र जेव्हा तो मीडियासमोर आला तेव्हा त्याने या सर्व बातम्या निव्वळ अफवा असल्याचे सांगितले. फैजल खानने त्याचा सख्खा भाऊ आणि सुपरस्टार आमिर खानवर स्वतःच्या अपहरणाचा आरोप लावला होता. फैजल दोन दिवस बेपत्ता होता. नंतर तो पुण्यातून सापडला आणि मग त्याने मुंबईत आणण्यात आले होते. आमिरने वडिलांची सर्व संपत्ती मिळविण्यासाठी त्याला वेडे ठरविण्याची योजना बनवल्याचे त्याने सांगितले होते.
एका मुलाखतीमध्ये फैजलने थेट करण जोहरवर खळबळजनक आरोप करत सांगितले, “आमिरच्या ५० व्या वाढदिवशी एक व्यक्ती सारखा मला कमीपणा दाखवायचा प्रयत्न करत होती. मी आता त्या व्यक्तीचे नाव नाही सांगणार. करण जोहरसुद्धा माझ्यासोबत तसेच वागला. तो माझ्यासोबत खूपच वेगळा वागत होता आणि सारखा मला कमीपणा दाखवण्याचा प्रयत्न करत होता. जेव्हा मी कोणाशी बोलण्याचा प्रयत्न करत होतो तेव्हा तो सतत माझा अपमान करत होता.”
सोबतच तो पुढे म्हणाला, “इंडस्ट्रीमधील अनेकांनी मला त्यांच्या ऑफिसमध्ये येण्यास मज्जाव केला होता. ‘मेला’ सिनेमानंतर लोकांना माझे काम आवडेल आणि इंडस्ट्रीमधील लोकं मला काम देतील अशी अपेक्षा होती. मी अनेक दिग्दर्शकांच्या कार्यालयात गेलो. पण मला कोणीच भेटण्यासाठी वेळ दिला नाही. जरी तुमचे वडील मोठे दिग्दर्शक असले त्यांच्या नावावर पहिले काम मिळेल पण पुढे तुम्हालाच स्वत:ला पुढे नेत सिद्ध करायचे असते.”
फैजलच दिग्दर्शित आणि अभिनित असलेला ‘फॅक्टरी’ हा सिनेमा ३ सप्टेंबरला प्रदर्शित होत आहे.
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-बॉलिवूडच्या ‘अशा’ जोड्या जे एकमेकांपासून राहतात वेगवेगळे, पण अजूनही घेतला नाही घटस्फोट
-हद्द झाली! अमायरा दस्तूरने घातली ‘अशी’ बिकिनी; नेटकरी म्हणाले, ‘यांना नग्न व्हायला…’
-राखी सावंतने केली नाकाची शस्त्रक्रिया; व्हिडिओ शेअर करत सांगितले शस्त्रक्रियेचे कारण