Tuesday, June 24, 2025
Home बॉलीवूड मिस्टर परफेक्शनिस्ट आमीर खानच्या लेकीचा बॉयफ्रेंडसोबतचा व्हिडिओ झाला व्हायरल

मिस्टर परफेक्शनिस्ट आमीर खानच्या लेकीचा बॉयफ्रेंडसोबतचा व्हिडिओ झाला व्हायरल

सध्या बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट म्हणून ओळखला जाणारा  अभिनेता आमीर खानची (Aamir Khan) मुलगी इरा खान (Ira Khan) सोशल मीडियावर चांगलीच चर्चेत येताना दिसत आहे. काही दिवसांपूर्वीच इरा तिच्या वाढदिवस साजरा करतानाचे फोटो व्हायरल झाले होते. या फोटोंमध्ये इराच्या बिकीनी लूकमुळे अनेकांनी आमीर खानला ट्रोल केले होते. आता पून्हा एकदा आमीर खानच्या लाडक्या लेकीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून ज्यामध्ये ती आपल्या बॉयफ्रेंडसोबत गाडीवर फिरताना दिसत आहे. सध्या या फोटोची सर्वत्र चांगलीच चर्चा रंगली आहे. 

आमिर खानची मुलगी इरा खान आणि तिचा बॉयफ्रेंड नुपूर शिखर अनेकदा त्यांच्या सोशल मीडिया हँडलवर एकमेकांसोबतचे फोटो शेअर करत असतात. नुकताच नूपुरने त्याच्या इन्स्टाग्राम स्टोरीजवर दोघांच्या डेटचा एक व्हिडिओ आणि फोटो शेअर केला आहे, ज्यामध्ये इरा खान तिच्यासोबत दिसत आहे. इराने तिच्या इंस्टाग्राम स्टोरीजवर हा व्हिडिओ पुन्हा पोस्ट केला आहे, ज्यामध्ये ती बाइक चालवताना दिसत आहे. व्हिडिओमध्ये इरा बाइक चालवत आहे आणि नुपूर शिखर तिच्या मागे बसल्याचे दिसत आहे. त्याचबरोबर व्हिडिओमध्ये दिसत आहे की, नुपूर शिखर आयराला विचारतो, “तू कुठे चालली आहेस? यावर इरा खानने “आईस्क्रीमसाठी आपण आम्ही डेटवर जात आहोत.”

नुपूर शिखरने ती तिच्या इंस्टाग्राम स्टोरीजवर शेअर केली आहे, ज्यामध्ये इरा आईस्क्रीमसाठी पोज देताना दिसत आहे. या फोटोला त्यांनी मराठीत कॅप्शन “याने माझे आईस्क्रीम खाल्ले ” असा कॅप्शन दिला आहे. गेल्या वर्षी इराने नुपूर शिखरसोबत तिचे नाते इंस्टाग्रामवर अधिकृत केले होते. प्रॉमिस डेच्या दिवशी नुपूर शिखरसोबतचा एक फोटो शेअर करताना इरा खानने आपल्या प्रेमाची कबुली दिली होती. दोघांच्याही घरच्यांचेही जवळचे संबंध असल्याचीही माहिती समोर आली आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हे देखील वाचा