आमीर खान आणि आलिया भट्ट पहिल्यांदाच करणार एकत्र काम? जाणून घ्या पूर्ण डिटेल्स

हिंदी चित्रपट जगतात सध्या अनेक नवनवीन चित्रपट तयार होत आहेत. या चित्रपटांतून अनेक नवनवीन कलाकार एकत्र काम करताना दिसत आहेत. सध्या सिनेसृष्टीत आलिया भट्ट (Alia Bhatt)  आणि अभिनेता रणबीर कपूरच्या (Ranbir Kapoor) प्रेम प्रकरणाची जोरदार चर्चा सुरू आहे. दोघेही अनेकदा एकत्र फिरताना दिसले आहेत. आता ही प्रसिद्ध जोडी त्यांच्या आगामी ‘ब्रम्हास्त्र’ चित्रपटात पहिल्यांदाच एकत्र काम करताना दिसणार आहे. त्यामुळेच त्यांची सुंदर केमिस्ट्री पडद्यावर पाहायला चाहते उत्सुक झाले आहेत. आता हिंदी चित्रपट जगतातील आणखीही दोन कलाकार पहिल्यांदाच स्क्रिन शेअर करताना दिसणार आहेत. हे दिग्गज कलाकार म्हणजेच आलिया भट्ट आणि आमीर खान (Aamir Khan). कोणत्या कार्यक्रमात हे दोघे एकत्र येणार आहेत चला जाणून घेऊ. 

अभिनेता आमीर खान हा हिंदी चित्रपट जगतातील आघाडीचा अभिनेता म्हणून ओळखला जातो. आपल्या कसदार अभिनयाने त्याने हिंदी चित्रपट जगतात प्रचंड लोकप्रियता मिळवली आहे. अनेक आव्हानात्मक भूमिका आमीर खानने साकारल्या आहेत. त्यामुळेच त्याला मिस्टर परफेक्शनिस्ट म्हणून ओळखले जाते. त्याचबरोबर सध्या आलिया भट्टही आपल्या दमदार अभिनयामुळे सगळीकडे चर्चेत आहे. आता हे दोघेही लवकरच एकत्र एकाच मंचावर येणार आहेत.

आमिर खान आणि आलिया भट्ट एका विशेष प्रोजेक्टसाठी एकत्र येणार आहेत. या कार्यक्रमाचे शूटिंग नुकतेच मुंबईच्या स्टुडिओमध्ये पूर्ण झाले आहे. दोघेही पहिल्यांदाच एकत्र काम करणार असल्याने त्यांच्या चाहत्यांमध्ये उत्सुकता लागली आहे. याआधी आमीर खान आणि आलिया भट्ट ‘आरआरआर’ चित्रपटाच्या प्रमोशनवेळी दिल्लीत एकत्र दिसले होते. यावेळी आरआरआर चित्रपटाच्या टीमसोबत आमीर खानने भन्नाट डान्सही केला होता ज्याचा व्हिडिओ सगळीकडे चर्चेत आला होता. आता हे पुन्हा एकदा हे कलाकार एकत्र येणार असल्याने चांगलाच धमाका त्यांच्या चाहत्यांना पाहायला मिळणार आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा-

Latest Post