भोजपुरी अभिनेत्री आम्रपाली दुबे (Aamrapali Dubey) सध्या तिच्या आगामी ‘मैं से मिला दा मैया वैष्णो देवी’ या चित्रपटाच्या चित्रीकरणात व्यस्त आहे. चित्रीकरणादरम्यान, तिने नुकतेच माता वैष्णो देवीच्या मंदिराला भेट देऊन दर्शन घेतले. अभिनेत्रीने माता राणीच्या भेटीचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
अभिनेत्री आम्रपालीच्या आगामी चित्रपटाचे चित्रीकरण जम्मू आणि काश्मीरमधील माता वैष्णो देवी मंदिरात सुरू आहे. हा चित्रपट सत्य घटनांवर आधारित असल्याचे म्हटले जाते. चित्रीकरणादरम्यान, अभिनेत्रीने तिच्या सहकलाकारासोबत माता वैष्णो देवी मंदिराला भेट दिली.
आम्रपाली दुबेने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर एक पोस्ट शेअर केली आहे. कॅप्शनमध्ये लिहिले आहे, “जय माँ वैष्णो देवी. ‘मै से मिला दा मैया वैष्णो देवी’ या चित्रपटाचे चित्रीकरण वैष्णो माता मंदिरात सुरू आहे. मी माझ्या आईसोबत माता राणीचे दर्शन घेतले. प्रतिभावान आणि समर्पित अभिनेते कुंदर भारद्वाजही उपस्थित होते.” अक्षरा सिंहने आम्रपालीच्या पोस्टवर कमेंट करत लिहिले, “तू भाग्यवान आहेस. जय माता दी.”
माता राणीचे दर्शन घेतल्यानंतर, कुंदर भारद्वाज यांनी आपला अनुभव सांगताना लिहिले, “मला माता जगत जननी जगदंबा माई वैष्णो देवी यांच्या चरणी काम करण्याचे भाग्य लाभले आहे. देव आणि आमच्या परिवाराच्या पूर्वजांचा मला असाच आशीर्वाद लाभो.” ‘माई से मिला दा मैया वैष्णो देवी’ या चित्रपटाबद्दल बोलायचे झाल्यास, याचे दिग्दर्शन पंकज सिन्हा करत आहेत.
दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
हेही वाचा
अपघात होऊनही शिल्पा शेट्टी हाताने शिवलेला ड्रेस घालून कामावर गेलेली; अभिनेत्रीने सांगितला किस्सा










