Saturday, July 6, 2024

काळ्या रंगाचा ड्रेस आणि सुंदर आर्या आंबेकर, सौंदर्याची व्याख्या जणू हीचं

चित्रपटसृष्टीमध्ये ‘ब्युटी विद टॅलेंट’ खूप कमी अभिनेत्रींमध्ये पाहायला मिळते. यातीलच मराठी चित्रपटसृष्टीतील आघाडीची गायिका आणि अभिनेत्री म्हणजे आर्या आंबेकर. आपल्या सुरांनी प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करण्यासाठी आणि सौंदर्याने सर्वांना वेड लावण्यासाठी आर्या नेहमीच सज्ज असते. ‘सारेगामापा लिटिल चॅम्प्स’मधून नावारुपाला आलेली आर्या खूपच सुंदर दिसते. तिच्या अदा पाहून कोणीही स्वतःला तिच्या प्रेमात पडण्यापासून थांबवू शकत नाही. अशातच लाखोंना भुरळ घालणारा तिचा एक फोटो समोर आले आहेत.

आर्याने अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवरून काळ्या रंगाच्या ड्रेसमधील काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोमध्ये आपण पाहू शकतो की, फ्लोरल ड्रेसमध्ये ती खूपच सुंदर दिसत आहे. फोटोमध्ये ती वेगवेगळ्या पोझ देताना दिसत आहे. तिचा हा लूक सगळ्यांना खूप आवडला आहे. (Aarya ambekar share her beautiful photo on social media)

आर्याचा हा लूक ‘कोण महाराष्ट्राचा फेवरेट कोण? सुवर्णदशक सोहळ्या’तील आहे. या वर्षी तिला ‘ती सध्या काय करते’ चित्रपटातील ‘हृदयात वाजे समथिंग’ या गाण्यासाठी फेवरेट गायिका या पुरस्कार मिळाला आहे. हा पुरस्कार स्वीकारताना देखील तिने फोटो शेअर करून सगळ्यांचे आभार मानले आहे. तिच्या अनेक चाहत्यांना तिचा हा लूक खूप आवडला आहे.

आर्याने मराठी संगीत क्षेत्राला अनेक गाणी दिली आहेत, तिने ‘जरा जरा’, ‘हृदयात वाजे समथिंग’, ‘कितीदा नव्याने’, ‘ओ साजणा’ यासारखी गाणी गायली आहेत. यासोबतच तिने अनेक मालिकांचे टायटल सॉंग्स गायले आहेत. तसेच तिने ‘ती सध्या काय करते’ या चित्रपटात काम केले आहे.

हेही वाचा :

या कारणामुळे दिलीप कुमारचा झाला एआर रहेमान! वाढदिवसानिमित्त जाणून घ्या असं काय घडलं होतं…

सलमान खान एआर रहमानला स्टेजवर म्हणाला होता, एक मध्यम संगीतकार, तेव्हा घडला ‘असा’ मनोरंजक किस्सा

बाप रे, ऋतुजा बागवेच्या चेहऱ्याला नक्की झाले तरी काय? समोर आले व्हिडिओ मागील सत्य

 

हे देखील वाचा