‘आशिकी’ चित्रपटात काम करून एकाच रात्रीत सुपरस्टार होणारी अभिनेत्री म्हणजे अनु अगरवाल होय. याचमुळे तिला बॉलिवूडमध्ये ‘आशिकी गर्ल’ म्हणून ओळख मिळाली. हा चित्रपट पाहून प्रेक्षक तिच्या सौंदर्याने मोहित झाले होते आणि तिची एक झलक पाहण्यासाठी तिच्या घराबाहेर तासंतास रांगा लावत असत. या चित्रपटानंतर अनुकडे चित्रपटांच्या रांगा लागल्या होत्या. ‘आशिकी’नंतर अनुने ‘किंग अंकल’ आणि ‘खलनायिका’ सारख्या चित्रपटात काम केले आहे. मात्र, ‘आशिकी’ हा चित्रपट सोडला, तर तिच्या इतर कोणत्याही चित्रपटाला फारसे यश मिळू शकले नाही. १९९९ मध्ये अनुसोबत एक अपघात झाला, ज्याने तिचे फिल्मी करिअरच नाही, तर तिचे आयुष्यही उद्ध्वस्त केले. अनुने मंगळवारी (११ जानेवारी) तिचा ५३वा वाढदिवस साजरा केला. चला तर मग तिच्या वाढदिवसानिमित्त तिच्यासोबत झालेल्या या अपघाताबद्दल जाणून घेऊया.
अनुचा (Anu Aggarwal) जन्म ११ जानेवारी, १९६९ रोजी दिल्लीत झाला होता. अनुच्या म्हणण्यानुसार, “१९९६ पर्यंत चित्रपट केल्यानंतर मला वर्ल्ड टूर करायची होती. हे मी माझ्या असिस्टंटला सांगितल्यावर त्याला वाटले की, मला मानसोपचारतज्ज्ञाची गरज आहे. खरंतर मला वाटू लागले की, मी बॉलिवूड प्रकारची नाही, म्हणून मी माझे वांद्रेतील घर आणि कार विकली.” त्यानंतर ती जागतिक दौऱ्यावर गेली.
दरम्यान, १९९९ मध्ये एका भीषण कार अपघातानंतर अनु कोमात गेली आणि काही काळ ती बेशुद्ध झाली. सुमारे २९ दिवस कोमात राहिल्यानंतर अनु शुद्धीवर आल्यावर ती स्वतःला पूर्णपणे विसरली होती. या अपघातातून सावरायला तिला बरीच वर्षे लागली आणि तोपर्यंत तिची फिल्मी कारकीर्दही संपली होती.
स्मरणशक्ती कमी झालेल्या अनुवर तीन वर्षे उपचार सुरू होते. त्यानंतर तिची स्मरणशक्ती परत आली. अनुने एका मुलाखतीत सांगितले होते की, “मी सुरुवातीपासून योगा करत असे आणि १९९७ मध्ये मी उत्तराखंडच्या आश्रमात योगा शिकले, पण याच दरम्यान १९९९ मध्ये माझा अपघात झाला आणि मी कोमात गेले. डॉक्टरांनी माझ्या पालकांना सांगितले की, ती कोमात मरेल, पण योगाच्या मदतीने मी मृत्यूलाही हरवले.”
अनु शेवटची १९९६ मध्ये आलेल्या ‘रिटर्न ऑफ ज्वेल’ चित्रपटात दिसली होती. यात तिच्यासोबत देव आनंद आणि धर्मेंद्र यांनीही काम केले होते. बऱ्याच दिवसांपासून चित्रपटांपासून दूर असलेल्या अनुचा चेहरा खूप बदलला आहे आणि तिला ओळखणे देखील खूप कठीण आहे.
अनुने १९९६ नंतर कोणताही चित्रपट केला नाही. पुढे ती योगा आणि अध्यात्माकडे वळली. अपघातानंतर अनु आता ग्लॅमर जगापासून दूर झोपडपट्टीत जाऊन गरीब मुलांना मोफत योगा शिकवते. अनु शेवटची ४ वर्षांपूर्वी एप्रिल २०१८ मध्ये महेश भट्ट यांच्या प्रोडक्शन हाऊस विशेष फिल्म्सच्या ३० व्या वर्धापन दिनाच्या पार्टीमध्ये दिसली होती.
Happy birthday to you. @anusualauthor .. Wishing you many more years and celebrations to come.. #AnuAggarwal #HBDAnuAggarwal pic.twitter.com/FR9i0tg3fa
— ???????? ramana garikipati ???? (@ramana4456) January 11, 2022
अनुने तिची कथा ‘असामान्य: मेमोयर्स ऑफ अ गर्ल हू केम बॅक फ्रॉम डेड’ या चरित्रात लिहिली आहे. सध्या अनु एक फाऊंडेशन चालवत आहेत. ज्याचे नाव ‘अनु अगरवाल फाऊंडेशन’ आहे. याअंतर्गत ती मुंबईच्या झोपडपट्टीत राहणाऱ्या गरीब मुलांना मोफत योगा शिकवते.
अनुने दिल्ली विद्यापीठातून समाजशास्त्राचे शिक्षण घेतले आहे. अभ्यासादरम्यान अनुला महेश भट्ट यांनी त्यांच्या ‘आशिकी’ चित्रपटात पहिल्यांदा काम दिले होते. वयाच्या अवघ्या २१ व्या वर्षी अभिनयाच्या दुनियेत दाखल झालेल्या अनुला या चित्रपटाने एका रात्रीत स्टार बनवले.
अनु अगरवालच्या कारकिर्दीबद्दल बोलायचे झाले, तर तिने ‘गजब तमाशा’, ‘खलनायिका’, ‘किंग अंकल’, ‘कन्यादान’, ‘जन्म कुंडली’ आणि ‘रिटर्न टू ज्वेल थीफ’ यांसारख्या चित्रपटांमध्ये काम केले. अनु तमिळ चित्रपट ‘थिरुदा- थिरुदा’ आणि ‘द क्लाउड डोर’ या लघुपटातही दिसली आहे.
अनुला दैनिक बोंबाबोंबकडून वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा…!!!
हेही वाचा-