Wednesday, April 23, 2025
Home मराठी स्नेहासोबत घटस्फोट झाल्यानंतर ‘अशी’ झाली होती आविष्कारची हालत; ‘बिग बॉस मराठी’च्या घरात केला खुलासा

स्नेहासोबत घटस्फोट झाल्यानंतर ‘अशी’ झाली होती आविष्कारची हालत; ‘बिग बॉस मराठी’च्या घरात केला खुलासा

‘बिग बॉस मराठी’चे तिसरे पर्व सुरू होऊन एक आठवडा झाला आहे. या एकाच आठवड्यात अनेकांचा खरा चेहरा समोर आला आहे. स्पर्धकांमध्ये वाद-विवाद झाले आहेत. अनेकांची चांगली मैत्री झाली आहे. तर काहींचे जुने वाद समोर आले आहेत. यात दोन सदस्यांचा भूतकाळ अनेक वर्षांनी त्यांच्या समोर येऊन उभा राहिला आहे. अनेक वर्ष एकमेकांपासून लांब राहिलेल्या या दोघांना आता घरात २४ तास एकमेकांचा सामना करावा लागत आहे. ते स्पर्धक म्हणजे स्नेहा वाघ आणि आविष्कार दार्व्हेकर.

स्नेहा आणि आविष्कार हे घटस्पोटी जोडपे आहे. काही वर्षापूर्वी ते एकमेकांच्या प्रेमात होते. त्यांनी लग्न करून त्यांचा संसार देखील थाटला होता. पण त्यांच्यातील वैयक्तिक कलहामुळे त्यांचा घटस्फोट झाला. आविष्कारने त्याच्या आयुष्यातील त्या घटनेचा खुलासा केला आहे. (Aavishkar darvhekar addicted to drink after divorce with sneha wagh)

आविष्कार बिग बॉसच्या घरात जय दुधानेला त्यांच्या घटस्फोटानंतर तो कोणत्या परिस्थितीमधून गेला होता हे सांगतो. यावेळी आविष्कार जयला सांगतो की, त्यांचे नाते तुटले, तेव्हा तिने त्याच्यावर अनेक आरोप केले होते. तसेच तो म्हणतो की, तो दारूच्या नशेत बुडाला होता. त्याला बाकी कोणत्याच गोष्टी दिसत नव्हत्या. यावर जय म्हणतो की, “स्नेहा घरात खूपच शांत दिसते.” यावर आविष्कार म्हणतो की, “ती अजिबातच शांत नाहीये. हळूहळू ती तिचे खरे रूप सगळ्यांना दाखवेल.”

सुरुवातीला या शोमध्ये स्नेहाची एन्ट्री झाली आणि नंतर आविष्कारची एन्ट्री झाली. तो आल्यानंतर स्नेहाच्या चेहऱ्यावरील हावभाव बदललेले जास्त कोणी पाहिले नाही. स्नेहा जेव्हा १९ वर्षांची होती तेव्हा तिने आविष्कारसोबत लग्न केले होते. पण काही वर्षानंतर ते विभक्त झाले. तिने आविष्कारवर घरगुती अत्याचाराचा आरोप लावला होता. त्यानंतर तिने घटस्फोट घेतला.

स्नेहाने पहिल्या घटस्फोटानंतर तब्बल सात वर्षांनी पुन्हा एकदा लग्नगाठ बांधली. तिने इंटेरियर डिझायनर अनुराग सोलंकीसोबत लग्न केले होते. परंतु त्यांच्यातही वैयक्तिक कलह झाला आणि लग्नाच्या आठ महिन्यांनंतरच ते विभक्त झाले.

नुकतेच बिग बॉसच्या घरात आविष्कारने एक सुंदर कविता सादर केली होती. त्याच्या या कवितेला सगळ्यांनी खूप चांगला प्रतिसाद दिला. त्यावेळी स्नेहा देखील त्याची ही कविता ऐकत होती. परंतु ती त्याच्याकडे दुर्लक्ष करत इतरत्र बघत होती. कविता सादर झाल्यानंतर आविष्कारने स्नेहाला विचारले की, तिला कविता कशी वाटली? पण तिने सांगितले की, ही कविता तिने या आधी कधीच ऐकली नव्हती. आता ते दोघे घरात कसे वागणार आहेत, त्यांचे तुटलेले हे बंध बिग बॉसमुळे जवळ येतील की त्यांच्या नात्यात आणखी अंतर येईल हे पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत.

दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-जेव्हा महेश भट्ट यांना समजवण्यासाठी नग्नावस्थेत रस्त्यावर धावल्या होत्या परवीन बाबी, मग पुढे…

-Netflix TUDUM: माधुरी दीक्षितचा डिजिटल डेब्यू, तर ‘अरण्यक’च्या धमाक्यासह ‘या’ प्रोजेक्ट्सची झाली घोषणा

-सिनेमागृह सुरू करण्यास शासनाचा हिरवा कंदील, तरीही ‘लाल सिंग चड्ढा’ प्रदर्शनाची तारीख लांबणीवरच

हे देखील वाचा