Saturday, April 20, 2024

Netflix TUDUM: माधुरी दीक्षितचा डिजिटल डेब्यू, तर ‘अरण्यक’च्या धमाक्यासह ‘या’ प्रोजेक्ट्सची झाली घोषणा

शनिवारी सायंकाळी नेटफ्लिक्सच्या ग्लोबल फॅन इवेंट TUDUM चे व्हर्चुअल आयोजन करण्यात आले होते. यूट्यूबवर लाइव स्ट्रीम केलेल्या या इव्हेंटमध्ये अनेक वेब सिरीजचे फर्स्ट लूक दाखवण्यात आले. त्यातीलच काही वेब सिरीज विषयी जाणून घेऊयात.

फाइंडिंग अनामिका
माधुरी दीक्षितच्या ‘फाइंडिंग अनामिका’ या वेबसिरीजचा फर्स्ट लूक येथे दाखवतात आला. यामध्ये एक पत्नी आणि आईमधील नाते दाखवले आहे. तसेच एक दिवस ती महिला गायब होते. त्यानंतर तिचा शोध घेणे सुरू होते. यामध्ये माधुरी कधीही न साकारलेल्या अनोख्या भूमिकेमध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. (Raveena Tandon to Madhuri Dixit, many artists will be seen on Netflix)

अरण्यक
रवीना टंडनच्या अरण्यक या वेब सिरीजमध्ये ती एक पोलिस अधिकारी म्हणून झळकणार आहे. यात ती एका लहान मुलाचा शोध घेत असते. त्यावेळी जमिनीमध्ये पुरलेले काही हाडांचे अवशेष तिला सापडतात. सिरीजमध्ये जंगलात होणाऱ्या सिरीयल हत्येवर भाष्य करण्यात आले आहे. रवीना बरोबर यामध्ये आशुतोष राणा आणि परमब्रता चटर्जी देखील झळकणार आहे.

खुफिया
लेखक अमर भूषण यांच्या ‘एस्केप टू नोवेयर’या पुस्तकावर आधारित दिग्दर्शक विशाल भरद्वाजचा ‘खुफिया’ हा चित्रपट आहे. या थ्रिलरमध्ये अली फजल, तब्बू आणि आशिषसह अन्य काही कलाकार झळकणार आहेत.

मिन्नल मुरली
दिग्दर्शक बेसिल जोसेफ आणि अभिनेता टोविनो थॉमस यांच्या चित्रपटाची देखील एक क्लिप येथे दाखवण्यात आली. चित्रपटामध्ये एका छोट्या शहरातील शिंपीची कहाणी आहे. त्याला एक दिवस आकाशातील वीजेचा झटका लागतो आणि त्याला खूप शक्ती मिळते असे चित्रपटामध्ये दिसणार आहे. तसेच झटका लागल्यानंतर त्याचे पूर्ण आयुष्यच बदलून जाते.

मीनाक्षी सुंदरेश्वर
सान्या मल्होत्रा आणि अभिमन्यु दसानी यांच्या या चित्रपटात लॉन्ग डिस्टेंस लग्न दाखवले जाणार आहे. मीनाक्षी आणि सुंदरेश्वर यांची जोडी देवानेच बनवली आहे, पण त्यांच्या आयुष्यात खूप वेगवेगळे वळण येताना चित्रपटात दिसणार आहेत. तसेच चित्रपटामध्ये प्रेम कहाणी आणि कौटुंबिक ड्रामा देखील दिसणार आहे.

प्लॅन ए प्लॅन बी
रितेश देशमुख आणि तमन्ना भाटिया अभिनित ‘प्लॅन ए प्लॅन बी’ या सिरीजमध्ये घटस्फोट देणारा वकील आणि एका मॅच मेकरची स्टोरी दाखवण्यात येणार आहे. दोघांच्या बातचीतचा एक व्हिडिओ देखील सोशल मीडियावर पोस्ट करण्यात आला, ज्याला प्रेक्षकांचे खूप प्रेम मिळत आहे.

लिटिल थिंग्ज
मिथिला पालकरची ‘लिटिल थिंग्ज’ वेब सिरीज पुन्हा एकदा चौथ्या पर्वातून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. यामध्ये ध्रुव आणि काव्याची प्रेम कहाणी पुन्हा एकदा प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. याचा ट्रेलर देखील यावेळी दाखवण्यात आला. ‘लिटिल थिंग्ज’या वेब सिरीजचे हे शेवटचे पर्व आहे.

मिसमॅच
प्राजक्ता कोळी आणि रोहित सराज या दोघांची ‘मिसमॅच’ वेब सिरीज देखील दुसऱ्या पर्वामधून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या शोमध्ये प्रेक्षकांना खूप अनोख्या गोष्टी पाहायला मिळणार आहेत. ज्यामध्ये पूर्ण कहाणीच वेगळ्या दिशेला जाताना दिसेल.

बाकीच्या प्रोजेक्ट्स बद्दल बोलायचे झाल्यास क्रिश हेम्सवर्थचा ‘एक्सट्रैक्शन’ चित्रपट देखील प्रेक्षकांचे मनोरंजन करणार आहे. तसेच ‘कोबरा काई’, ‘सेक्स एजुकेशन’, ‘स्ट्रेंजर थिंग्ज’, ‘ब्रिजरटन’ यासह अन्य चित्रपट आणि वेब सिरीज प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी नेटफ्लिक्सवर येण्यास सज्ज झाल्या आहेत.

दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-…म्हणून शूटींगच्या सेटवर फराह खानने लगावली होती जुही चावलाच्या कानशिलात; अभिनेत्रीने स्वत: केला खुलासा

-देव आनंद यांच्या रूपावर मरायच्या तरुणी, ‘यामुळे’ त्यांना सूट घालण्यावर शासनाने आणली होती बंदी

-अर्चना पूरन सिंग यांनी रात्री पळून जाऊन केलं होतं लग्न, बरंच चर्चेत राहिलंय त्यांचं वैयक्तिक आयुष्य

हे देखील वाचा